मुंबई : विवो मोबाईल कंपनीने आपला नवा कोरा Vivo Y56 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईलप्रेमी या स्मार्टफोनची वाट पाहात होते. विवोच्या नव्या कोऱ्या स्मार्टफोमध्ये 50 एमपी कॅमेरा, 6.58 इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले आणि 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींमध्ये स्मार्टफोनची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आत आहे. विवो वाय56 5जी प्लास्टिक फ्रेम बॉडीसह बनवला आहे. स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह दोन सर्कुलर कॅमेरा कटआउट दिले आहेत. विवोचा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 वर तंत्रज्ञानावर आधारित फनटच ओएस 13 सह येतो.विशेष म्हणजे विवोचा हा स्मार्टफोन 5 जी नेटवर्कला सपोर्ट करतो.या फोनचं वज 184 ग्रॅम इतकं असून आकार 164.05×75.60×8.15 मीमी आहे.हा स्मार्टफोन ऑरेंज शिमर आणि ब्लॅक इंजिन कलरमध्ये उपलब्ध आहे.
विवो वाय56 5 जी स्मार्टोफोनमध्ये 6.58 इंचाची आयपीएसस एलसीडी पॅनल आहे. त्यामुळे फुल एचडी प्लस (2408 x 1080 पिक्सल) रेझॉल्यूशन आहे. स्क्रिन रिफ्रेश रेट 60 हर्ट्स आहे. डिस्प्लेवर वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. तसेच मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आहे. एक्सटेंडेट रॅम 3.0 फीचरसह स्टोरेजसाठी रॅम 8 जीबीपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या हँडसेटमध्ये 5000एमएएच बॅटरी आहे. युएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.कनेक्टिव्हिटीसाठी मोबाईलमध्ये 5.1 ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस यासारखे फीचर्स आहेत.
या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे असून प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, तर सेकंडरी कॅमरा 2 मेगापिक्सलचा आहे. दोन्ही कॅमेरे नाइट मोडला सपोर्ट करतात. तर सेल्फी आणि व्हिडीओसाठी पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये फोटो, नाइट, पोर्ट्रेट, व्हिडीओ, पॅनोरोमा, लाइव्ह फोटो, स्लो मोशन, टाइम लॅप्स आणि प्रो यासारखे फीचर्स दिले आहेत.
विवो वाय56 5जीच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 19999 रुपये आहे. हा फोन तुम्हाला रिटेल स्टोर किंवा विवो इंडियाच्या ई-स्टोरवरून घेता येईल. तर काही बँकाच्या ऑपरमधून हजार रुपयांची सूट मिळेल.