मुंबई : Vodafone ने मागील मोठ्या काळाच्या विश्रांतीनंतर प्रीपेड ग्राहकांसाठी एक खास प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार वोडाफोन ग्राहकांना 16 रुपयांच्या रिचार्जवर 1GB डाटा मिळणार आहे. या डाटाची वैधता 24 तास असणार आहे. हा प्लॅन आयडियाच्या ग्राहकांनाही उपलब्ध असणार आहे.
वोडाफोनच्या या 16 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट डाटासोबत कॉल आणि SMS चा लाभ उपलब्ध होणार नाही. ग्राहकांना एका दिवसात 1GB 2G/3G/4G डाटा मिळेल. या प्लॅनच्या नावातच या प्लॅनचा उद्देश स्पष्ट होत आहे. अनेकदा दररोजचा निश्चित 1GB डाटा चित्रपट पाहताना संपून जातो आणि मग दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पाहावी लागते. मात्र, 16 रुपयांच्या या प्लॅनमुळे ग्राहकांना डाटा संपल्यानंतर तत्काळ रिचार्ज करुन चित्रपट विनाअडथळा पाहता येईल. आयडियाने देखील असाच 16 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे.
वोडाफोन ग्राहकांना 16 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा इंटरनेट रिचार्ज करायचा असेल तर त्यासाठीही अनेक पर्याय आहेत. 29 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 500MB डाटा, 47 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 दिवसासाठी 3GB डाटा मिळेल. तसेच 92 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7 दिवसांसाठी 6GB डाटा मिळेल. 28 दिवसांच्या वॅलिडिटीच्या प्लॅनमध्ये 98 रुपये, 49 रुपये आणि 33 रुपयांचा प्लॅनही उपलब्ध आहे. यात अनुक्रमे 3GB, 1GB आणि 500MB डाटा मिळेल.
वोडाफोनने काही काळासाठी 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला होता. मात्र, आता कंपनीने 100 रुपये आणि 500 रुपयांचा प्लॅन पुन्हा आणला आहे. या व्यतिरिक्त कंपनीने 10 रुपये, 1,000 रुपये आणि 5,000 रुपयांचा प्लॅनही ठेवला आहे. या रिचार्ज प्लॅनची एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे टॉकटाईमची व्हॅलिडिटी. या रिचार्जमधील बहुतेक टॉकटाईमला केवळ 28 दिवसांची व्हॅलिडिटी आहे.