Vodafone down | राज्यात व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका

| Updated on: Oct 15, 2020 | 5:03 PM

राज्यातील काही भागात बुधवार (14 ऑक्टोबर) रात्रीपासून VI चे नेटवर्क गायब झाले आहे.(Vodafone-Idea network down in Parts of Maharashtra)

Vodafone down | राज्यात व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका
Follow us on

मुंबई : देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प  झाले आहे. पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना connectivity failure त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावर ग्राहकांकडून जोरदार टीका केली जात आहे. (Vodafone-Idea network down in Parts of Maharashtra)

राज्यातील काही भागात बुधवार (14 ऑक्टोबर) रात्रीपासून VI चे नेटवर्क गायब झाले आहे. त्यामुळे पुणे आणि आसपास भागात VI च्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी VI चे नेटवर्क डाऊन झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीची पोलखोल केली.

नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर VI च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली. यामुळे ट्वीटरवर #Vodafone down #vodafone india हे व्होडाफोनचे टॅग ट्रेंडिंगमध्ये आले आहेत.

पुणे शहरात बुधवारी रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडले. रात्री 09 ते 11 या दोन तासात संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कात्रज भागात रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शिवाजीनगरला 93 मिलीमीटर पाऊस पडला. कात्रज तलाव, टांगेवाला कॉलनीसह आणि अरणेश्वर परिसरातील नागरिकांना घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी प्रशासनाला महापालिकेच्या शाळेत हलवावे लागले.

दरम्यान अनेक भागात व्होडाफोन आयडियाचा नेटवर्क प्रॉब्लेम होत असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. तसेच त्यावर काम सुरु असून त्यासाठी किमान 5 ते 6 तसेच अवधी लागेल, असे कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारानंतर कंपनीने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुसळधार पावसामुळे नेटवर्कमध्ये बिघाड 

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. पुणे, मुंबई, नाशिक , नागपूर या महानगरांमध्ये व्होडाफोन ग्राहकांचा संपर्क तुटला आहे.

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया या कंपनीने कंबर कसली आहे. गेल्याच महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीने आपली ओळख बदलली होती. कंपनीने या नवीन ब्रॅंडचे अनावरण केले होते. यापुढे व्होडाफोन-आयडिया ही कंपनी VI (व्ही) या नावाने ओळखली जाईल, असे कंपनीने म्हटलं आहे. याच बरोबर कंपनीने www.myvi.in ही नवीन वेबसाईट लाँच केली होती. सध्या या नेटवर्कचे ग्रामीण भागात 16 कोटी ग्राहक असून ही दुसरी मोठी सेवा पुरवठादार कंपनी आहे. (Vodafone-Idea network down in Parts of Maharashtra)

संबंधित बातम्या : 

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ पाच कार बघाच!