मुंबई : आयफोन आपल्याकडे असावा असं अनेक तरुणांना वाटत असतं. अनेकदा सेकंडहँड फोन घेऊन काही जण इच्छा पूर्ण करतात. तर काही जण जुनी सीरिज घेऊन समाधान मानतात. सध्या आयफोन 14 सीरिज सुरु आहे. असं असलं तरी आयफोन 11 ची क्रेझ काही कमी झालेली नाही. हा फोन घेण्यासाठी आजही तरूण मागे पुढे पाहात नाही. जर तुम्हालाही आयफोन 11 स्वस्तात घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरील Annual Flipkart Big Billion Days Sale आणि अॅमेझॉनच्या Great Indian Festival सेल मध्ये स्वस्तात मिळत आहे. या फोनवर खिशाला परवडेल असा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हालाही हा फोन घ्यायचा असेल तर नेमकी काय ऑफर आहे जाणून घ्या
आयफोन 11 ची किंमत 48900 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर 1901 रुपयांच्या सुरुवातीच्या डिस्काउंटसह किंमत 46999 रुपये इतकी होते. एचएसबीसी बँक, इंडसइंड बँक आणि वन क्रेडिट कार्डवरून ईएमआयचं पेमेंट केलं तर 100 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. त्यामुळे या हँडसेटची किंमत 45999 रुपये इतकी होते. त्याचबरोबर फ्लिपकार्टवरील ग्राहकांना एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर स्वीकारल्यास हँडसेटवर 20 हजार रुपयांपर्यंत सूट मिळु शकते.पण एक्सचेंज ऑफर जुन्या मोबाईलच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफर मिळाली तर सवलतीची रक्कम 22901 रुपये इतकी होईल. त्यानंतर फ्लिपकार्टवर आयफोन 11 फक्त 25999 रुपयांना मिळेल.
आयफोन 11 मध्ये 6.1 इंचांची लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले आहे. हुड अंतर्गत यात ए13 बायोनिक चिपसेट आहे. मोबाईलच्या मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यापैकी प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सल आहे. तर सेल्फीसाठी पुढे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.आयफोन 11 कंपनीने काही महिन्यांपूर्वी बंद केला होता. कारण Apple iPhone SE 3 5G या फोनवर त्याचा परिणाम होत होता. आयफोन 11 सीरिजमध्ये आयफोन 11 प्रो, आयफोन 11 प्रो मॅक्सचा समावेश आहे. आयफोन 11 सीरिज बंद केली असली तरी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
मार्केट रिसर्चर काउंटरपॉइंटने दिलेल्या अहवालानुसार, आयफोन 14 प्रो तयार करण्यासाठी 464 डॉलर म्हणजेच 38400 रुपये खर्च येतो.आयफोन 13 प्रोच्या तुलनेत उत्पादन खर्च 3.7 टक्के जास्त आहे. आयफोन 13 प्रो 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. तेव्हा आयफोन 13 प्रोची किंमत 1,19,900 रुपयांपासून होती. आयफोन 14 ची किंमत वाढण्यामागचं कारण म्हणजे नवा प्रोसेसर आणि कॅमेरा मॉड्युल हे आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 48 एमपी प्रायमरी कॅमेरा आहे.आयफोन 14 प्रोची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरु होते. आयफोन 14 प्रो बेस व्हेरियंटची ही किंमत 128 जीबी इंटरनल मेमरीसाठी आहे.