मुंबई : स्मार्टफोनच्या युगात आपण रोज नवनवे प्रयोग करत असतो. पूर्वी फक्त संवादासाठी असलेल्या फोननं हळूहळू कात टाकत स्मार्टफोनचं रुप घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्या प्रभाव टाकण्यासाठी या माध्यमातून काही ना काही प्रयोग करत असतो. कोणी रिल्स बनवतो, कोणी स्टेटस ठेवतो, तर कोणी डीपी ठेवून आपल्या भावना व्यक्त करत असतो. एक वेळ अशी होती की, नुसत्या रिंगटोननं लक्ष वेधून घेतलं जात होतं. इतकंच काय तर रिंगटोन आवडली तर त्याच्याकडून आवर्जून घेतली जायची. त्याचबरोबर कोणतं गाणं ट्रेंड झालं तर ते गाणं सेट केली जायची. सध्या काही लोकांना फोन केला तर त्यांच्या नावाची रिंगटोन ऐकू येते. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की, कशी सेट असेल.
तुम्हालाही तुमच्या नावाची रिंगटोन सेट करायची असेल, तर आज आम्ही यासाठी सोपी पद्धत सांगणार आहोत.यासाठी तुम्हाला नेटवर शोधाशोध गरज नाही. सोप्या पद्धतीने तुमच्या नावाची रिंगटोन सेट करा आणि फोन करणाऱ्या व्यक्तीला ऐकवा. त्यांच्यावर प्रभाव टाकण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल.दोन पद्धतीने तुम्ही सहजरित्या रिंगटोन सेट करू शकता.