मुंबई : प्रवास आणि मोकळा वेळ असला की आपण वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्याकडे मोर्चा वळवतो. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन यासारखे अनेक अॅप असून त्या माध्यमातून आपण चित्रपट आणि वेब सीरिज पाहतो. पण यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे युट्यूबर जे काही मिळतं ते आपण पाहतो. पण जर तुम्ही व्होडाफोन ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण व्होडाफोननं नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म अतरंगीसोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून व्होडाफोन युजर्स रिजनल चित्रपटांचा आनंद लुटू शकतात.युजर्संना वीआय प्लानच्या माध्यमातून मोफत चित्रपट आणि वेब सीरिज पाहता येतील.
जर नवे चित्रपट आणि टीव्ही शो पाहायचे असतील तर हा प्लान तुमच्यासाठी फायदेशीर आहे. व्हीआय प्लानमध्ये युजर्संना प्रीमियम ओटीटी कंटेंट मोफत बघायला मिळणार आहे.यात Zee5, Atrangi, Discovery, Shemaroo, Hungama, Yupp Tv यांचा अॅक्सेस असेल.
या व्यतिरिक्त युजर्संना 400 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही पाहण्याची संधी मिळेल. यात Zee TV, Discovery, Zee Cinema, ColorsHD, Discovery, MTV या सारख्या वाहिन्यांचा समावेश आहे. या प्लानच्या माध्यमातून बातम्याही पाहता येतील. न्यूज चॅनेल्स मोफत अॅक्सेस देण्यात आला आहे.
वीआय युजर्स या अॅपच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह डिजिटल कटेंट देखील पाहू शकतात. यात अनेक नवे चित्रपट आणि शो यांचा समावेश. थ्रिलर, मायथोलॉजी, क्राईम, कॉमेडी, रोमान्स अशा कॅटेगरीतील कंटेंट पाहू शकता.
गोल्डन हार्वेस्ट, पांचाली, पारो, द डेव्हिल इनसाइड ते द बुल ऑफ दलाल स्ट्रीट, तंदुरा, पेपर, क्लाइंट नंबर 7, तडप, शुद्धी, चहल, पहचान, ऑनलाइन फ्रॉड आणि परशुरामसारखा कंटेंट पाहता येईल.