Alert | स्मार्टफोनवर पॉर्न पाहणे पडू शकते भलतेच महागात, जाणून घ्या कसे…

| Updated on: Jun 22, 2021 | 10:55 AM

बरेच लोक या पॉर्न वेबसाईटवर काही व्हायरस सोडतात, ज्यामुळे आपला मोबाईल डेटा हॅक होऊ शकतो.

Alert | स्मार्टफोनवर पॉर्न पाहणे पडू शकते भलतेच महागात, जाणून घ्या कसे...
स्मार्टफोनवर पॉर्न पाहिल्यास आपण सहजपणे एखाद्या ब्लॅकमेलिंगचा बळी बनू शकता.
Follow us on

मुंबई : आपण आपल्या स्मार्टफोनवर पॉर्न फिल्म पाहता? तुम्हाला अशा अश्लील चित्रफिती पाहण्याची सवय लागली आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे होय अशी असतील, तर तुम्ही फार मोठ्या संकटात अडकण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये पॉर्न पाहणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, आजकाल जगभरातील बहुतेक लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पॉर्न किंवा त्यांच्याशी संबंधित इतर गोष्टी पाहायला आवडतात. चला तर, जाणून घेऊया आज, स्मार्टफोनमध्ये अशा अश्लील चित्रफिती पाहणे किती धोकादायक ठरू शकते…( Watching porn on mobile is dangerous and led to cybercrime)

स्मार्टफोनवर पॉर्न पाहिल्यास आपण सहजपणे एखाद्या ब्लॅकमेलिंगचा बळी बनू शकता. यामागचे कारण असे आहे की, बरेच लोक या पॉर्न वेबसाईटवर काही व्हायरस सोडतात, ज्यामुळे आपला मोबाईल डेटा हॅक होऊ शकतो. तसेच, असे काही व्हायरस आहेत, जे आपला मोबाइल लॉक करतात आणि नंतर अनलॉक करण्यासाठी पैशाची मागणी करतात आणि आपल्याला ब्लॅकमेल देखील करतात. ही सर्व फसवणूक अनेक वेबसाईटद्वारे केली जात आहे.

अश्लील अ‍ॅप डाऊनलोड करणे धोकादायक

काही लोकांना पॉर्न पाहणे इतके आवडते की, लोक त्याचे अ‍ॅप देखील डाऊनलोड करतात. बर्‍याच वेबसाईटवर असे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची ऑफर आहे आणि लोक ते डाऊनलोडही करतात. त्याच वेळी, अशा काही अश्लील साईट्स आहेत, ज्या काही अॅप्स स्वतःच डाऊनलोड करण्यास प्रारंभ करतात. या अ‍ॅप्समध्ये धोकादायक व्हायरस आहेत, ज्यामुळे आपला मोबाईल डेटा लीक होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपल्याला स्वयंचलित अ‍ॅप्स डाऊनलोड वैशिष्ट्य (ऑटो डाऊनलोड) नेहमी बंद करावे. अन्यथा आपला मोबाईल डेटा चोरीला जाऊ शकतो (Watching porn on mobile is dangerous and led to cybercrime).

सायबर क्राईम वाढत आहे!

आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अश्लील गोष्टी पहात असाल, तर आम्ही आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आजच्या काळात सायबर गुन्हेगारीत बरीच वाढ होऊ लागली आहे. स्मार्टफोन आणि पीसीमध्ये पॉर्न पाहणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्मार्टफोनचा सर्व डेटा एकमेकांशी जोडलेला आहे. परंतु पीसीच्या आत आपण वेगवेगळ्या विंडो उघडू शकता, ज्या एकमेकांशी पूर्णपणे कनेक्ट नसतात. यामुळे आपला मोबाईल डेटा चोरी होण्यास फारसा वेळ लागत नाही. यातूनच सायबर क्राईमच्या घटना वाढल्या आहेत.

व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिसेस (व्हीएएस)

स्मार्टफोनमध्ये पॉर्न पाहणे खूपच महागडे ठरू शकते, कारण काही पॉर्न साईट्स अवैध व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिसेसशी बेकायदेशीरपणे जोडल्या गेल्या आहेत. काही लोक या साईटवर अधिक पैसे कमविण्यासाठी अशा सेवा जोडतात. या पॉर्न वेबसाईट्स आपल्या मोबाइलमध्येच व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिसेस सक्रिय करतात, जेणेकरून त्यांना आपल्या मोबाईल बॅलन्समधून पैसे कमी करता येतील.

पॉर्न टिकर व्हायरस आणते.

पॉर्न टिकर बर्‍याच पॉर्न वेबसाईटवर दिसतो, तो एखाद्या व्हिडीओप्रमाणे दिसतो. पण, जर त्यावर क्लिक केले तर मोबाईलमध्ये काही व्हायरस शिरतात. हे डेटा चोरण्याचे एक तंत्र देखील आहे. ही समस्या आधीपासूनच येत आहे. परंतु या समस्येचे निराकरण अद्याप झाले नाही. या प्रकारच्या पॉर्न टिकर वेबसाईटवर बर्‍याचदा आढळतात, जे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

आवश्यक आयडी-पासवर्ड चोरीला जाऊ शकतो!

पॉर्न वेबसाईटवर बर्‍याच अधिसूचना आहेत, ज्यामुळे तुमचा महत्त्वाचा आयडी किंवा पासवर्ड चोरण्याचा धोका वाढतो. एका क्लिकवर आपण आपला आयडी पासवर्ड केव्हा लीक केला हे कळणार देखील नाही. हॅकर्सनी या पॉर्न वेबसाईटवर असा व्हायरस टाकलेला असतो की, आपण आपला महत्त्वाचा आयडी पासवर्ड त्यात चोरीला जातो. म्हणूनच तुम्हाला अधिक जागरुक राहण्याची गरज आहे, अन्यथा तुम्हाच्या बँक खात्याला धोका असू शकतो. आजकाल लोक त्यांची बँक खाती डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करतात. आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आयडी पासवर्ड, कोणत्याही पॉर्न साईटवर गेल्यावर चोरी होण्याचा धोका वाढतो.

(Watching porn on mobile is dangerous and led to cybercrime)

हेही वाचा :