मुंबई : हेडफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रवासाच्या दगदगीपासून ऑफिसपर्यंत किंवा अगदी मित्रांपासून ऑनलाईन लेक्चरपर्यंत सर्वच ठिकाणी हेडफोन फार उपयोगी पडतात. मात्र तुम्ही नेमके कोणते हेडफोन वापरता, त्याचे नाव काय, त्याचा प्रकार कोणता याची तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. चला तर मग जाणून घेऊया हेडफोन/इयरफोनच्या प्रकारांविषयी. (What are the Different Types of Headphones know the details)
अगदी सर्वच ठिकाणी वापरण्यात येणारा हेडफोनचा प्रकार म्हणजे IEM (इन-इअर मॉनिटर्स) हेडफोन. या हेडफोनला बारीक वायर असून ते कानात अतिशय व्यवस्थित बसतात. हे हेडफोन हाताळणे अगदी सोपे असते. विशेष म्हणजे तुम्ही प्रवासादरम्यान ते सहज वापरु शकता. या हेडफोनची किंमत 100 रुपयांपासून सुरु होते.
‘इन इअर्स’ हेडफोन हे कानावर व्यवस्थित बसतात. या हेडफोनला हेडबँड असतात. हे हेडफोन विशेषत: एखादा चित्रपट बघताना वापरले जातात. या हेडफोनचा आवाज थोड्या जास्त प्रमाणात येतो. अनेकदा या हेडफोनसोबत माईकही असतो.
कान पूर्णपणे झाकून त्याभोवती घट्ट बसणाऱ्या या हेडफोन्सना ‘ओव्हर इअर्स’ हेडफोन असे म्हणतात. हे हेडफोन हल्ली अतिशय लोकप्रिय ठरत आहेत. या हेडफोनचा आकार मोठा असतो. त्यामुळे त्याच्यातून येणारा आवाज हा मोठा आणि स्पष्ट असतो.
जर तुम्हालाही व्हिडीओ किंवा कॉम्प्युटर गेम खेळण्याची सवय असेल, तर तुम्ही हे हेडफोन नक्की खरेदी करायला हवे. हे हेडफोन विशेषत: गेम खेळणाऱ्यांसाठी डिझाईन केलेले असतात.
सध्या तरुण-तरुणी सर्रास वायरलेस हेडफोनचा वापर करत असतात. या हेडफोन ब्ल्यूटुथद्वारे कनेक्ट करता येतात. एकही वायर नसलेले हे हेडफोन हाताळायला फार सोपे असतात. सध्या या हेडफोनला प्रचंड मागणी आहे.
इतर बातम्या
YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा
भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री
अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा
(What are the Different Types of Headphones know the details)