हिवाळ्यात गीझर किंवा वॉटर हीटर हा घराचा महत्त्वाचा भाग बनतो. तुम्हाला हीटर चांगलं चालवायचं असेल आणि बराच काळ टिकावं, असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही त्याची नियमित सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. सुरक्षितते व्यतिरिक्त, स्केलिंग टाळण्यासाठी गीझरला नियमित सर्व्हिसिंगची देखील आवश्यकता असते. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
अनेक जण गॅस किंवा इलेक्ट्रिक गीझरचा वापर करतात आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वी त्यांची सर्व्हिसिंग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी गॅस आणि इलेक्ट्रिक गीझरच्या सर्व्हिसिंगची माहिती देणार आहोत.
गीझर सर्व्हिसिंगची किंमत
सामान्य सेवा: साधारणपणे साध्या सर्व्हिसिंगसाठी 300 ते 600 रुपये मोजावे लागतात. यात गीझर साफ करणे, पाईप तपासणे आणि सामान्य दुरुस्तीचा समावेश आहे.
अॅडव्हान्स सर्व्हिस: गीझरमध्ये बिघाड झाल्यास त्याची किंमत जास्त असू शकते. हीटर कॉइल, थर्मोस्टॅट किंवा इतर भाग बदलल्यास खर्च वाढू शकतो. अशावेळी तो 800 ते 1500 रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.
टँक लीक किंवा सेन्सर रिप्लेसमेंट: यासाठी आपल्याला 1500 ते 3 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो, कारण यासाठी अधिक वेळ आणि विशेष उपकरणांची आवश्यकता असते.
फसवणुकीपासून बचाव कसा करायचा?
गीझरच्या मूलभूत कार्याची जाणीव ठेवा जेणेकरून मेकॅनिकशी बोलताना आपल्याला काय आवश्यक आहे आणि काय नाही हे समजू शकेल. सर्व्हिसिंगपूर्वी किंमतीचा अंदाज विचारा आणि त्याची तुलना वेगवेगळ्या मेकॅनिकशी करा. कोणताही भाग बदलण्यापूर्वी मूळ भाग विचारा आणि त्याची पावती किंवा गॅरंटी घ्या.
मेकॅनिक्स काय करतात?
बनावट बिघाड : अनेकदा मेकॅनिक्स गरज नसताना एखादी समस्या सांगून अतिरिक्त खर्च करण्याचा प्रयत्न करू शकतात. जसे की हीटर कॉइल किंवा थर्मोस्टॅट ठीक असताना बदलण्याचा सल्ला देणे.
मूळ भागाऐवजी डुप्लिकेट भाग : काही वेळा मेकॅनिक्स कमी दर्जाचे किंवा बनावट भाग बसवतात आणि मूळ भागासाठी शुल्क आकारतात.
ओव्हरचार्जिंग : काही मेकॅनिक्स सेवेचे ओव्हरचार्ज करतात आणि तांत्रिक भाषेत ग्राहकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.
छोट्या समस्या मोठ्या करणे : काही वेळा किरकोळ समस्या गंभीर म्हणून वर्णन केल्या जातात, जसे की किरकोळ पाईप गळती संपूर्ण यंत्रणेचा दोष म्हणून सांगितलं जातं.
मेकॅनिकचा गोंधळ टाळू शकता
गीझरच्या सेवेसाठी विश्वासार्ह किंवा नामांकित सेवा केंद्र निवडा, जेणेकरून आपल्याला योग्य सेवा आणि किंमत मिळेल. गीझर सेवेदरम्यान या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही खर्चावरही नियंत्रण ठेवू शकता आणि मेकॅनिकचा गोंधळ टाळू शकता.