करमणुकीचे सर्वात मोठे साधन म्हणजे टीव्ही. त्यातही आता टीव्हीचे काही प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने LCD TV आणि LED TV ला सर्वाधिक मागणी आहे. पूर्वी बाजारात साधे टीव्ही उपलब्ध होते, त्यानंतर त्यातच अपडेट्स होत बाजारात LCD TV,LED TV, Smart TV दाखल झाले.
सर्वात आधी बाजारात साधे टीव्ही होते. परंतु हे टीव्ही खूप हेवी (वजनदार), आकाराने मोठे होते, तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात वीज खर्च होत होती. त्यामुळे त्यात अनेक अपडेट्स होऊन बाजारात LCD ( Liquid-Crystal Display) टीव्ही दाखल झाले. त्यानंतर या LCD टीव्हींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. त्यानंतर यामध्ये अजून अपडेट्स झाले आणि बाजारात LED टीव्ही दाखल झाले. आता LED (Light-Emitting Diode) टीव्हींना बाजारात मोठी मागणी आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का या LCD आणि LED टीव्हींमध्ये काय फरक आहे. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
LCD TV ची स्क्रीन 1 इंचापर्यंत जाड असते तर LED TV ची स्क्रीन 1 इंचापेक्षा कमी जाडीची असते.
LCD TV जास्त वीज घेतात तर LED TV साठी तुलनेने कमी वीज लागते.
एलसीडी टीव्ही हे एलईडी टीव्हीच्या तुलनेत थोडे स्वस्त असतात, तर एलईडी टीव्ही थोडे महाग असतात.
एलसीडी पेक्षा एलइडी टीव्ही जास्त प्रकाशित असतात आणि त्यात रंगदेखील जास्त असतात.
एलसीडी टीव्ही 165 अशांपर्यंतच्या कोनात पाहता येतात. म्हणजेच घरातील सर्व कोपऱ्यात बसून एलसीडी टीव्हीच्या स्क्रीनवरील चित्र स्पष्ट दिसत नाहीत टीव्हीसमोरील काही ठराविक जागेत बसल्यानंतरच अशा टीव्हीच्या स्क्रीनवरील चित्र स्पष्ट दिसतात. तर एलईडी टीव्ही 180 अंशांपर्यंतचा व्ह्यू देतात. त्यामुळे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही या टीव्हीच्या स्क्रीनवरील चित्र स्पष्टपणे पाहू शकता.