व्हॉट्सॲप हे इन्स्टंट मेसेजिंगॲप आहे, ज्याचा वापर आज जगभरात कोट्यवधी लोकं करतात. व्हॉट्सॲपद्वारे आपण मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी गप्पा मारतो. तसेच ऑडिओ-व्हिडिओ कॉल करून त्यांची विचारपूस करतो. एवढंच नव्हे तर व्हॉट्सॲपवरून आपण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्तीचा आठवणींचा व्हिडिओ सापडल्यावर ती फाईल देखील आरामात शेअर करतो असे फीचर्स व्हॉट्सॲपमध्ये आपल्याला देण्यात आलेत.
व्हॉट्सॲपमुळे आपण आपल्या बाहेरगावी असलेल्या व्यक्तीशी फक्त एका इंटरनेट कनेक्शनमुळे बोलू शकतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. बऱ्याच लोकांना याची माहिती नसते. पण, काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ते बंद देखील करू शकता. व्हॉट्सॲप वरील लोकेशन कसे बंद करू शकता हे या लेखातून जाणून घेऊयात.
तुमचे लोकेशन होऊ शकते ट्रॅक
व्हॉट्सॲपवरून कॉल करण्यासाठी लोकांना फक्त इंटरनेट कनेक्शनची गरज असते. व्हॉट्सॲप कॉल थेट दोन डिव्हाइस कनेक्ट करतात. यानंतर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी सहज बोलू शकता. मात्र व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातूनही तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपचे प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉल्स फीचर कामी येते. व्हॉट्सॲप कॉल हे सर्व्हरद्वारे पाठवण्याचे काम करते, ज्यामुळे सुरक्षेचा एक अतिरिक्त लेअर जोडली जाते.
व्हॉट्सॲप कॉलदरम्यान तुमचं लोकेशन कुणीही ट्रॅक करू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे फीचर ऑन करू शकता. ऑनलाईन प्रायव्हसीसाठी हे फीचर ऑन करणे हे तुमच्या सुरक्षिततेसाठी योग्य पाऊल ठरू शकते.
व्हॉट्सॲप ओपन करा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करा.
त्यानंतर प्रायव्हसी वर क्लिक करा आणि नंतर सेटिंग्जनंतर ॲडव्हान्स पर्यायावर क्लिक करा.
येथे तुम्हाला प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉलचा पर्याय मिळेल. ते चालू करा.
हे फीचर इनेबल केल्याने कॉलदरम्यान तुमचा आयपी ॲड्रेस समोरच्या व्यक्तीपासून लपवला जाईल.
जेणेकरून कोणीही तुमचे लोकेशन ट्रेस करू शकणार नाही. तथापि यामुळे कधीकधी कॉलच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, कारण कॉल यापुढे थेट डिव्हाइसदरम्यान नव्हे तर व्हॉट्सॲप सर्व्हरशी कनेक्ट होईल.