नवी दिल्ली : WhatsApp ने चुकीला माफी देण्याची युक्ती वापरकर्त्यांच्या हातात दिली आहे. बऱ्याचदा घाईगडबडीत मॅसेज करताना अथवा नजरचुकीने मॅसेज करताना चूक होते आणि मग आपली धांदल उडते. तो मॅसेज डिलेट करण्याची कोण धांदल उडते. पण बहुप्रतिक्षेत असलेले फिचर एकदाचे WhatsApp ने लॉन्च केले आहे. हे फिचर त्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, जे चुकीचे मॅसेज पाठविण्यात एक्स्पर्ट असतात. अथवा एखाद्यावेळी अजाणतेपणाने चुकीचा संदेश पाठविल्या जातो. तर आता WhatsApp Edit फीचरच्या मदतीने चूक दुरुस्त करता येणार आहे.
काय आहे अट
WhatsApp ने एडिट फीचर वापरकर्त्यांच्या हातात दिले असले तरी त्याला एक अट पण घातली आहे. जर एखाद्याला त्याने पाठविलेला मॅसेज चुकीचा आहे असे वाटल्यास त्याला 15 मिनिटांच्या आत या फिचरचा वापर करावा लागेल. म्हणजे पंधरा मिनिटांच्या आत त्याला मॅसेज एडिट करावा लागेल. त्यानंतर हा मॅसेज एडिट करता येणार नाही. पण तो मॅसेज डिलिट करण्याचा वापरकर्त्यांचा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यांना मॅसेज डिलिट करता येईल.
अनेक बदलांची नांदी
सध्या अनेक बदलांची नांदी येऊ घातली आहे. एडिट ऑप्शनशिवाय वापरकर्त्यांना इतर पण अनेक फिचर मिळतील. व्हॉट्सअप एडिट फिचर क्रमाक्रमाने येत्या काही दिवसांत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. WhatsApp च्या मॅसेजमध्ये चुकीचे स्पेलिंग सुधारता येईल. तसेच एखादा नवीन शब्द, पर्यायी शब्द जोडता येईल. याविषयीच्या सेवेची चाचपणी सुरु आहे.
कसा कराल वापर
हे ठेवा लक्षात
तुम्ही जेव्हा मॅसेज एडिट करत असाल तेव्हा, त्याला लेबल केलं जाईल. मॅसेज प्राप्तकर्त्याला हे दिसेल की, तुम्ही संबंधित मॅसेड एडिट करत आहेत ते. पण तुम्ही काय बदलाव करत आहात, हे त्याला तेव्हाच दिसणार नाही. त्यासाठी त्याला वाट पहावी लागेल. मेटा कंपनीने फेसबुकला 10 वर्षांपूर्वीच एडिट फीचर दिले होते. पण व्हॉट्सॲपमध्ये आता ही सुविधा मिळणार आहे.