WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय
WhatsApp गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवे फिचर्स लाँच करत आहे. व्हॉट्सअॅप आता अॅपमध्ये शॉपिंग बटण अॅड करणार आहे. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, व्यापारासाठी हे फिचर उपयोगी ठरेल.
1 / 6
2 / 6
WhatsApp च्या या नव्या फिचरमुळे युजर्सना business whatsapp account च्या शेजारी शॉपिंग बटण दिसेल. हे बटण स्टोर आयकॉनप्रमाणे आहे.
3 / 6
4 / 6
WhatsApp शॉपिंग बटणाचा वापर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही बिझनेस अकाऊंटवर जावं लागेल. हे अकाऊंट कोणाचंही असू शकतं. ज्यांच्याकडून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट अथवा सर्व्हिस (सेवा) खरेदी केली असेल किंवा त्यासंबंधी मेसेज पाठवला-रिसिव्ह केला असेल, त्यांचं अकाऊंट बिझनेस अकाऊंट असू शकतं.
5 / 6
बिझनेस अकाऊंटमध्ये तुम्हाला शॉपिंग आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर समोरील अकाऊंटद्वारे विक्री होत असलेल्या प्रोटक्टची यादी दिसेल. त्यानंतर केवळ चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही वस्तूंची खरेदी करु शकता.
6 / 6
व्हॉट्सअॅपचा सध्या सुपर अॅप बनण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. नुकतंच व्हॉट्सअॅपने त्यांचं WhatsApp pay हे फिचर लाँच केलं आहे.