व्हॉट्सअपमध्ये येत आहे पुन्हा एक फिचर, एक वर्षापूर्वी कंपनीने केले होते बंद

| Updated on: Nov 27, 2023 | 4:10 PM

व्हॉट्सअप वापरणाऱ्या लाखो युजरसाठी एक नवीन फिचर भेटीला येत आहे. वास्तविक हे फिचर आधीच व्हॉट्सअपमध्ये होते. कंपनीने एकवर्षांपूर्वी ते बंद केले होते. आता कंपनीने पुन्हा हे फिचर आणण्याचे ठरविले आहे. तर पाहूयात कोणते हे फिचर आहे.

व्हॉट्सअपमध्ये येत आहे पुन्हा एक फिचर, एक वर्षापूर्वी कंपनीने केले होते बंद
whatsapp new features
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : मोबाईलवर चॅटींग आणि मॅसेजिंगसाठी भारतात व्हॉट्सअप सर्वात लोकप्रिय आहे. या व्हॉट्सवर सर्वसामान्यपणे नवीन फिचर लॉंच केले जाते आणि जुने फिचर कायमचे बंद केले जाण्याचा प्रघात आहे. परंतू आता कंपनी उलट करणार आहे. कंपनीने आपले एक जुने फिचर पुन्हा एकदा लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. या जुन्या फिचरला कंपनीने एक वर्षापूर्वी बंद केले होते. आता पुन्हा नव्याने ते युजरच्या भेटीला येणार आहे. चला तर पाहूयात कोणते फिचर पुन्हा एक वर्षांच्या गॅपने युजरच्या भेटीला येत आहे.

व्हॉट्सअपच्या या फिचरचे नाव व्ह्यू वन्स ‘View Once’ असे आहे. तुम्हाला ते माहीती देखील असेल. याच्या नवावरुन स्पष्ट होते की हे एकदा पाहिल्यानंतर संपून जाते. या फिचरमुळे युजर्सना फोटो आणि व्हिडीओ तुम्ही पाठवू शकता, त्यांना एकदा पाहिल्यानंतर ते आपोआप गायब होतील, म्हणजे नाहीसे होतील. म्हणूनच त्याला ‘View Once’ असे नाव देण्यात आले आहे.

या फिचरला व्हॉट्सअपने डेस्कटॉप युजर्ससाठी एक वर्षांपूर्वी बंद केले होते. आता बातमी अशी आहे की या फिचरला कंपनी पुन्हा आणत आहे. WABetainfo च्या अहवालानूसार हे फिचर काही बिटा युजरना पुन्हा वापरता येणार आहे. आणि लवकरच सर्वसामान्य युजरना देखील हे वापरता येणार आहे. व्हॉट्सअपमध्ये लवकरच आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा ( एआय) देखील सपोर्ट मिळणार आहे. याची चाचणी बिटा व्हर्जनवर होत आहे. बिटा युजर्सने याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. बातमीनूसार व्हॉट्सअपचे हे नवीन अपडेट सध्या अमेरिकेतील बिटा युजरसाठी उपलब्ध आहे. नवीन अपडेटला एण्ड्रॉईडच्या बिटा व्हर्जन 2.23.24.26 वर पाहू शकता. बिटा युजरला एक व्हाईट बटण दिसत आहे. ज्यावर मल्टीकलर रिंग देखील आहेत.