WhatsApp New Features : व्हॉट्सअपमध्ये आले नवे ‘चॅनल’ फिचर, पाहा काय आहेत सुविधा

| Updated on: Sep 14, 2023 | 4:18 PM

व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी नवीन चॅनल नावाचे फिचर आले आहे. हे फिचर इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलच्या धर्तीचे आहे. पाहूयात काय आहेत त्याची वैशिष्ट्ये

WhatsApp New Features : व्हॉट्सअपमध्ये आले नवे चॅनल फिचर, पाहा काय आहेत सुविधा
whatsapp channels
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : व्हॉट्सअपने नवीन ‘चॅनल’ फिचर आणले आहे. हे फिचर इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलसारखे काम करते. हे फिचर टप्प्या टप्प्याने लागू करण्यात येत आहे. नवीन फिचरला कंपनी अपडेट टॅबच्या अंतर्गत असेल. जेथून आपल्याला स्टेटस अपडेट आणि चॅनल दिसतील. चॅनल फिचर अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे प्रसिद्ध आहेत. जे सोशल मिडीयावर कंटेंट तयार करतात त्यांच्यासाठी हे फिचर महत्वाचे आहेत. याद्वारे सेलिब्रिटींना त्यांच्या फॉलोअर्सशी जुळण्यास मदत होणार आहे.

व्हॉट्सअप चॅनल फिचर आधी असलेल्या ग्रुप्स आणि कम्युनिटी फिचरहून एकदम वेगळे आहे. हे फिचर कंपनीने जादा युजरपर्यंत पोहचण्यासाठी तयार केले आहे. व्हॉट्सअपच्या अन्य फिचर्सप्रमाणे चॅनल फिचर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नाही. चॅनल क्रिएट केल्यानंतर एडमिनला अनेक अधिकार मिळतील. म्हणजे कोणाचा समावेश करायचा तसेच कंटेंट फॉरवर्डींग आदी.

चॅनल फिचर इंस्टाग्रामच्या चॅनल फिचर सारखेच आहे. ज्यात एडमिन फोटो, व्हिडीओ, इमोजी, व्हॉईस नोट आदी आपल्या फॉलोअर्ससाठी पोस्ट करु शकणार आहेत. चॅनलशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सर्च करावे लागेल. चॅनलमध्ये एडमिन आणि फोलोअर्सची डीटेल्स एकमेकांना दिसणार नाहीत. आणि युजर्स सोप्या पद्धतीने क्रिएटर किंवा सेलिब्रिटीशी जोडले जाऊ शकतात. सध्या चॅनल फिचर नवे आहे. यात नंतर अनेक बदल होऊ शकतात. एडमिन तीस दिवसातच चॅनलमधील आपल्या पोस्टला एडीट करु शकतील. त्यानंतर ती व्हॉट्सअप सर्व्हर मधून डीलीट होईल. तसेच एडमिन कोणत्याही पोस्टला चॅनलमधून ग्रुप किंवा चॅटमध्ये शेअर करेल तेव्हा समोरच्याला चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी ऑप्शन ( लिंक बॅक ) मिळेल. त्यामुळे युजरला त्याविषयाची जास्त माहीती मिळू शकेल.

कोणत्याही चॅनलला असे जॉईंट व्हा

कोणत्याही चॅनलला जॉईंट होण्यासाठी सर्वात आधी एपला अपडेट करावे लागेल. आता एपमध्ये येऊन अपडेट टॅबमध्ये यावे, येथे स्टेटसच्या खाली आपल्याला वेगवेगळे चॅनल दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीच्या चॅनलशी स्वत:ला जोडू शकता. जर आता तुम्हाला चॅनल फिचर दिसत नसेल तर तुम्हाला थोडा आणखी वेळ लागू शकतो.