WhatsApp मधले सीक्रेट फीचर्स माहित आहेत का? ॲप न उघडता अनेक कामं करता येणार
WhatsApp कंपनी सातत्याने त्यांचा प्लॅटफॉर्म अपडेट करत असते आणि त्यात नवनवीन फीचर्स समाविष्ट करत असते. पण आज आम्ही तुम्हाला एका खास फीचरबद्दल सांगणार आहोत, जे एक सीक्रेट फीचर आहे आणि ते प्रत्येक अँड्रॉईड मोबाईल यूजरपर्यंत रोलआऊट झाले आहे.
1 / 6

2 / 6
व्हॉट्सअॅपचे हे फीचर फक्त अॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे. हे व्हॉट्सअॅपचे कॅमेरा फीचर आहे. या फीचरचा वापर करून तुम्ही व्हॉट्सअॅपमध्ये फोटो सेव्ह करू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते कोणत्याही यूजर्सला पाठवू शकता.
3 / 6
या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचा कंटेंट, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. यासाठी ऑनलाइन येण्याची गरज नाही. डेटा कोणत्याही चॅटमध्ये शेअर केला जाऊ शकतो.
4 / 6
यासाठी युजर्सना त्यांचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर जा आणि डिस्प्लेवर क्लिक करा आणि होल्ड करा. यानंतर स्क्रीनच्या तळाशी विजेट्सचा पर्याय येईल.
5 / 6
विजेट्सवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला काही पर्याय मिळतील, त्यापैकी एक व्हॉट्सअॅप कॅमेराचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर होम स्क्रीनवर कुठेही सेट करा.
6 / 6
आता या पर्यायावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअॅपचा कॅमेरा थेट ओपन करु शकता. यानंतर तुम्ही फोटो आणि व्हिडिओही शेअर करू शकता.