WhatsApp स्टोरेजचं टेन्शन संपवणार, ‘ही’ ट्रिक करेल काम

| Updated on: Jan 03, 2025 | 7:55 PM

आजकाल प्रत्येकाच्या फोनचे व्हॉट्सॲप स्टोरेज फुल होऊन जाते. त्यामुळे नवीन आलेले फोटो किंवा इतर कामाची फाईल ओपन करून बघणे कठीण होते. त्यामुळे अनेकजण या समस्येला कंटाळून गेले आहेत. तुम्हालाही व्हॉट्सॲपमध्ये स्टोरेजच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर या टिप्स फॉलो करा. यानंतर तुमच्या फोनमध्ये स्टोरेजची समस्या राहणार नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी ॲपचीही गरज भासणार नाही. तसेच कोणतेही स्टोअरेज विकत घ्यावे लागणार नाही.

WhatsApp स्टोरेजचं टेन्शन संपवणार, ही ट्रिक करेल काम
whatsapp
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

इन्स्टंट मेसेजिंग ॲप असलेलं व्हॉट्सॲप आता बहुतांश लोकांच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सॲप हे ॲप आता जगातील करोडो आणि अब्जावधी लोक दररोज मेसेजिंगसाठी वापरतात. चॅटिंगसोबतच व्हॉट्सॲप आपल्याला व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा देते. त्यामुळे आता ऑफिस असो की शाळा, सर्व कामे त्यातूनच पूर्ण होतात. त्यावर दिवसरात्र एवढ्या गप्पा होतात की यात फोटो-व्हिडीओ शेअरिंग आणि चॅटमध्ये प्रत्येक गोष्टीला स्टोरेजची गरज असते. स्टोरेजची क्षमता संपली तर कोणतेच मेसेज किंवा फोटो व्हिडिओ व महत्वाच्या फाईल्स ओपन करून बघता येत नाही. अशावेळी काय करावे सुचत नाही? तर तुम्हाला यासाठी फार काही करावे लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या ट्रिक्स स्टेप बाय स्टेप फॉलो करा. यानंतर तुम्ही आनंदाने व्हॉट्सॲप वापरू शकाल.

या स्टेप्स फॉलो करा

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप ओपन करा. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी ही एकच प्रक्रिया आहे. दोन्ही फोनमधील स्टोरेज क्लिअर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

– तुमच्या व्हॉट्सॲप सेटिंग्स ऑप्शनवर जा. त्यानंतर स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा. मॅनेज स्टोरेज पर्यायावर क्लिक करा. डेटा सॉर्ट करा, फिल्टर करा आणि डिलीट करा.

– चॅट किंवा चॅनेल निवडा. त्यानंतर डिलीट आयटमवर क्लिक करा. एखाद्या फोटो-व्हिडिओच्या अनेक कॉपी असतील तर जागा तयार करण्यासाठी सर्व कॉपी डिलीट करा.

– व्हॉट्सॲपवरून अनावश्यक मीडिया फाईल्स डिलीट करा. फोन गॅलरीत तुम्हाला हा पर्याय मिळेल. याशिवाय गॅलरीतून तुम्ही ते कायमचे डिलीट ही करू शकता. अश्याने तुमच्या फोनमध्ये स्टोरेज क्लिअर होऊन जाईल. जेव्हा जेव्हा तुमच्या फोनमध्ये स्टोरेजची समस्या येत असल्यास या स्टेप्स फॉलो करू शकता.

चॅट हिस्ट्री डिलीट करा

व्हॉट्सॲप स्टोरेज क्लिअर करण्यासाठी तुम्ही चॅट हिस्ट्री डिलीट करू शकता. यासाठी संबंधित चॅट ओपन करा. वरील तीन ठिपके किंवा चॅटमधील सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा. मोर ऑप्शनवर क्लिक करा. ‘क्लिअर चॅट हिस्ट्री’चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि चॅट हिस्ट्री डिलीट करा. बहुतेक जागा ग्रुप चॅटची असते. आपण वेळोवेळी आपले ऑफिस ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप चॅट डिलीट करून स्टोरेज क्लिअर करू शकता. दर आठवड्याच्या विकेंडला तुम्ही स्टोरेज क्लिअर करत रहा. असे केल्याने तुम्हाला स्टोरेजच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.