मुंबई : चॅटिंगसोबत प्रोफेशनल कामांसाठीही व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर सध्या वाढत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. वर्षाअखेरपर्यंत अफॉर्डेबल सॅशे साईझ हेल्थ इन्शुरन्स खरेदी करता येईल, असं व्हॉट्सअॅपने नुकतंच जाहीर केलं. म्हणजेच WhatsApp च्या माध्यमातून तुम्ही आरोग्य विमाही विकत घेऊ शकाल. SBI General Insurance Co. Ltd सोबत व्हॉट्सअॅपने करार केला आहे. याशिवाय HDFC सोबतही पेन्शनशी निगडित विमा खरेदी करता येईल. (WhatsApp to help Indian users buy sachet sized health insurance)
फेसबुकच्या ‘फ्यूल ऑफ इंडिया 2020’ या कार्यक्रमात व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस यांनी याविषयी माहिती दिली. “व्हॉट्सअॅप भारतात 40 कोटींपेक्षा अधिक सक्रिय युजर्ससाठी कटिबद्ध आहे. हे आमच्यासाठी सर्वात मोठे मार्केट आहे. सोप्या, विश्वसनीय, गोपनीय आणि सुरक्षित माध्यमातून लोकांना एकमेकांशी जोडणे ही आमची प्राथमिकता आहे” असं बोस म्हणाले.
सर्वच क्षेत्रात डिजीटल पेमेंट
“भारतातील छोट्या व्यावसायिकांना डिजीटली अधिक सक्षम करण्यास मदत करण्याची व्हॉट्सअॅपची इच्छा आहे. त्यामुळे विक्रेत्यांना आपल्या आवडीच्या व्यवसायाशी जोडता येईल आणि खरेदी प्रक्रियाही सुलभ होईल. त्यासाठी सर्वच क्षेत्रात डिजीटल पेमेंट सेवा सुरु करायची आहे, विशेषतः भारतातील परवाना नसलेल्या वापरकर्त्यांना समाविष्ट करण्याचा मानस अभिजीत बोस यांनी बोलून दाखवला.
सॅशे साईझ आरोग्य विमा
“व्हॉट्सअॅप सातत्याने अनेक योजनांवर काम करत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईलच्या माध्यमातून वित्तीय सेवा घेऊ शकतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावर्षाच्या अखेरपर्यंत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून युजर्स परवडणाऱ्या किमतीत सॅशे साईझ आरोग्य विमा खरेदी करु शकतील” असा विश्वास बोस यांनी व्यक्त केला.
“एज्यु-टेक आणि अॅग्री-टेकसारख्या क्षेत्रातही डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष्य गाठण्यासाठी मदत करु, असं व्हॉट्सअॅपने सांगितलं. एसबीआय जनरलचे परवडणारे आरोग्य विमा व्हॉट्सअॅपवरुन खरेदी करता येतील, असंही बोस यांनी सांगितलं. (WhatsApp to help Indian users buy sachet sized health insurance)
नवे फीचर : कार्ट्स
कार्ट्स या नव्या फीचरचे लाँचिंग करण्याची घोषणाही व्हॉट्सअॅपने केली. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये खरेदी-विक्रीला प्रोत्साहन मिळेल. व्हॉट्सअॅपवर दररोज 17.5 कोटींपेक्षा अधिक युजर्स बिझनेस अकाऊण्टवर मेसेज करतात. तर तीस लाखांपेक्षा जास्त भारतीय प्रत्येक महिन्याला बिझनेस कॅटलॉग पाहतात.
नवीन शॉपिंग फीचरच्या मदतीने ग्राहक एका मेसेजसरशी विक्रेत्यांच्या अनेक वस्तू निवडू आणि ऑर्डर करु शकतात. याशिवाय व्यावसायिकांशी ऑर्डरबाबत विचारणा, रिक्वेस्ट मॅनेज करणेही सोपे जाईल. रेस्टॉरंट किंवा कपड्याच्या दुकानात खरेदी करणं यामुळे सुलभ होईल.
संबंधित बातम्या :
Whatsapp Payment : 9 सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअॅप पेमेंटचा फंडा
फेसबूक आणणार नवा व्हिडीओ प्लॅटफॉर्म, सेलिब्रेटी,कंटेट क्रिएटर्ससोबत सेल्फी काढण्याची सोय
(WhatsApp to help Indian users buy sachet sized health insurance)