नवी दिल्ली : व्हॉट्सॲप (WhatsApp) हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी सतत नवनवीन अपडेट्स (updates) आणत असतो. अशा परिस्थितीत, रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲपला एक नवीन रूप मिळणार आहे. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म तुमचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी फीचर्स आणि ऑप्शन ॲक्सेस देण्यासाठी काम करत आहे. Android साठी WhatsApp च्या बीटा वापरकर्त्यांनुसार, हा प्लॅटफॉर्म, ॲपचा यूजर इंटरफेस बदलण्याचा विचार करत आहे. आणि ॲपच्या तळाशी एक नवीन नेव्हिगेशन बार (navigation bar) दिसेल.
व्हॉट्सॲप वर सगळं बदणार
यामध्ये, चॅट्स, कॉल्स, कम्युनिटीज आणि स्टेटस सारखे टॅब नवीन प्लेसमेंट आणि व्हिज्युअल अपीअरन्ससह खाली जाऊ शकतात. यामुळे वापरकर्त्यांना ॲपच्या तळापासून व्हॉट्सॲपचे अनेक सेक्शन्स पटापट नेव्हिगेट करणे सोपे होईल. सध्या, तुम्हाला हे सर्व टॅब ॲपच्या शीर्षस्थानी म्हणजेच टॉपला दिसत आहेत, त्यामुळे काही वापरकर्त्यांना टॅबमध्ये स्विच करणे थोडे कठीण होते, कारण आजकाल फोनचे डिस्प्ले थोडे मोठे असतात.
युजर्सना मिळेल अधिक उत्तम अनुभव
रिपोर्ट्सनुसार, हे सर्वात जास्त मागणी असलेल्या फीचर्सपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी WhatsApp शेवटी त्यात बदल करत आहे. बीटा युजरच्या रिपोर्टनुसार, हे कदाचित एक किरकोळ रीडिझाइन असेल.
व्हॉट्सॲप बीटा युजर्सना मिळेल अपडेट
व्हॉट्सॲप सेटिंग्ज विभागात बदल करेल किंवा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सेक्शनमध्ये काही चांगल्या फीचर्सपर्यंत ॲक्सेस देईल. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. जर आणखी काही बदल झाले तर लवकरच युजर्सना भविष्यात या अपडेट्सचा लाभ मिळेल. सध्या अँड्रॉइड 2.23.8.4 अपडेटसाठी WhatsApp बीटामध्ये लेटेस्ट बदल दिसून आला आहे.
आता चॅट करू शकता लॉक आणि हाईड
दरम्यान, WhatsApp एका प्रमुख प्रायव्हसी फीचरवर देखील काम करत आहे जे तुम्हाला तुमचे चॅट लॉक करून देईल आणि ते लपवताही येऊ शकेल. व्हॉट्सॲपच्या कॉन्टॅक्ट इन्फो सेक्शनमध्ये चॅट लॉक करण्याचा पर्याय दिसेल. वापरकर्ते चॅटसाठी पासकोड आणि फिंगरप्रिंट लॉक सेट करू शकतील. एकदा तुम्ही विशिष्ट चॅटसाठी हे फीचर एनेबल केल्यानंतर ॲप, ते सहजपणे लपवण्यासाठी शीर्षस्थानी लॉक केलेला चॅट विभाग ॲड करेल.