नवी दिल्ली | 24 February 2024 : व्हॉट्सॲपमध्ये अनेक नवीन फीचर्स आले आहेत. या नवनवीन फीचर्सची सातत्याने चर्चा होते. आता आणखी नवीन फीचर युझर्सच्या भेटीला आले आहे. व्हॉट्सॲप मल्टिपल अकाऊंटचे फीचर घेऊन येत आहे. सध्या बीटा युझर्ससाठी त्याची चाचपणी सुरु आहे. लवकरच सर्वसामान्य युझर्ससाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. व्हॉट्सअप एका स्टेट्स अपडेट आधारे त्याची माहिती देणार आहे. युझर्स आता एकाच फोनमध्ये दोन वेगवेगळे अकाऊंट चालवू शकतो. चला तर जाणून घ्या, कशी आहे प्रक्रिया, पण त्यापूर्वी तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करुन घ्या.
व्हॉट्सॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागेल. जर तुम्हाला फोनमध्ये दोन व्हॉट्सॲप वापरण्याची सुविधेचा पर्याय दिसत नसेल तर मग तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल. तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲपमध्ये अजून ते अपडेट कंपनीने केलेले नसेल. त्यामुळे व्हॉट्सॲप अपडेट करत राहा.
ही प्रक्रिय करा फॉलो
ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्या दोन व्हॉट्सॲप खात्यापैकी कोणत्याही एका खात्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ते वापरता येईल. हे त्या प्रमाणे करेल, जसे एका फोनमध्ये दोन वा त्यापेक्षा अधिक फेसबूकचा, इन्स्टाग्रामचा वापर होतो.