नवी दिल्ली : मोबाईलच्या व्हाट्सअप मॅसेजिंग सेवेमुळे आपले जीवनमानच बदलले आहे. रोज सकाळी आपण आपल्या मित्र आणि कुटुंबियांना मॅसेज पाठवून त्यांच्याशी अनेक गोष्टी शेअर करीत असतो. तर अशा या व्हॉट्सच्या मेसेजिंगच्या पद्धतीत आता नविनच बदल होणार आहे. इन्स्टंट मॅसेजिंग एप व्हॉट्सअप आपल्या युजरला चांगली सेवा देण्यासाठी या सेवेत अनेक नवनवीन फिचरचा समावेश करीत असते.त्याच एक नविन फिचर समाविष्ठ होणार आहे.
इन्स्टंट मॅसेजिंग एप व्हॉट्सअप आपल्या युजरला चांगली सेवा देण्यासाठी या सेवेत अनेक नवनवीन फिचरचा समावेश करीत असते. कंपनीने व्हाट्सअप मॅसेजिंग आणि व्हॉईस कॉलिंगचा अनुभव अधिक सुविधाजनक बनविण्यासाठी नविन फिचर आणण्याची तयारी केली आहे. व्हॉट्सअप मॅसेजिंग मध्ये मोठा बदल करणार आहे. आपण कुणाला चुकून पाठविलेला मॅसेज ठराविक काळापर्यंत डिलिट करीत असतो. परंतू आता कंपनी याच्याहीपुढे जात आणखीन नविन निर्णय आणला आहे.
नविन फिचरवर काम सुरू
व्हॉट्सअप एका नविन फिचरवर काम करीत आहे. आतापर्यंत आपण कुणाला चुकीचा संदेश पाठवलेला असेल तर त्या मॅसेजला ठराविक वेळात ‘डिलिट फॉर एव्हरीवन’ असे करीत होतो. परंतू आता त्याच्या पुढे जाणार आहोत. आता आपण सेंड केलेल्या मॅसेजलाही चक्क ‘एडीट’ करू शकणार आहोत, हे भन्नाट फिचर के्व्हा येणार ते अजून कळलेले नाही. या नव्या फिचरवर टेस्टींग चालू आहे. लवकरच ते युजरसाठी उपलब्ध होणार आहे. अनेक युजरची मागणी होती अशा प्रकारे पाठवलेल्या संदेशांनाही एडीट करण्याची सोय असावी. टेक्स्ट मधील चुका सुधारणे किंवा इम्बॉरेसिंग मॅसेजला सुधारण्याचा पर्याय असावा अशी युजरची मागणी होती.
पंधरा मिनिटांचा असेल टाईम लिमिट
व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरमध्ये पाठविलेल्या मॅसेजना पंधरा मिनिटापर्यंत एडीट करता येईल. त्यामुळे युजर आता मॅसेज बॉक्स मध्ये जाऊन मॅसेज सिलेक्ट करून त्यात एडीट ऑप्शनला निवडू शकणार आहेत. मिडीयात आलेल्या रिपोर्टनूसार व्हॉटसअप अजून या फिचरवर काम करीत आहे. मॅसेजला एडीट केल्यावर त्या मॅसेजला एडीट असे लेबल ही लागेल. सध्या हे बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. लवकरच सर्वच युजरला हे फिचर उपलब्ध होणार आहे.