व्हॉटसअपचा वापर जगभरात केला जात आहे. या मेसेजिंगसाठी व्हॉट्सअप सर्वाधिक वापरले जाते. युजर व्हॉटसअपवरुन व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल सारख्या सुविधाचा सर्रास वापर करीत आहेत. परंतू आता आयफोनवरुन व्हॉटसअप वापरणाऱ्यांसाठी चांगली बातमी नाही. कारण आयफोनच्या जुन्या मॉडेल्सवर आता व्हॉटसअप बंद होणार आहे. व्हॉटसअपने याआधीच घोषणा केली होती की iOS 15.1 जुन्या व्हर्जनवर आता व्हॉटसअप आपला सपोर्ट बंद करणार आहे. आता नवीन माहितीनुसार हा बदल मे २०२५ च्या आधी लागू होणार आहे. ज्यांच्या आयफोनवर जुने आयओएस व्हर्जन सुरु आहे. ते आता व्हॉटसअपचे नवीन अपडेट्स इस्टॉल करू शकणार नाहीत.
तुमच्याकडे जर जुने आयफोन असतील तर त्यावर नवीन व्हॉट्सअप इन्स्टॉल होणार नाही. ज्यांच्याकडे iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus सारख्या मॉडल्सवर आता व्हॉटसअप चालणार नाही. या आयफोन मॉडेल्सवर आता व्हॉटसअप अपडेट होणार नाही. WhatsApp आपल्या सेवेला नवीन iOS व्हर्जन आणि टेक्नॉलॉजी अनुरुप अपग्रेड करत आहे. ज्यामुळे जुन्या आयफोनवरील याचा सपोर्ट बंद होणार आहे.
WABetaInfo च्या बातमीनुसार व्हॉटेस बिटा व्हर्जन 25.2.10.72 मध्ये iOS 15.1 हून जुन्या डिव्हाईसेससाठी व्हॉटसअपचा सपोर्ट आधी बंद केला आहे. या बदलाला दुजोरा देण्यासाठी एक स्क्रीनशॉट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की जुन्या iOS व्हर्जनवाल्या iPhone युजर्ससाठी WhatsApp चे नवीन बिटा व्हर्जनला इस्टॉल करु शकणार नाहीत.
जर तुमचा आयफोन जुना असेल तर त्यात iOS 15.1 किंवा त्याहून नवीन व्हर्जन इंस्टॉल होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही व्हॉटसअप वापरू शकत नाही. जे युजर जुन्या बिटा व्हर्जनचा वापर करत आहेत. ते देखील केवळ एक महिन्यापर्यंतच हे व्हर्जन वापरु शकतील. त्यानंतर हे व्हॉटसअप संपूर्णपणे बंद होईल. त्यांना एकतर आयओएस अपडेट करावे लागेल किंवा नवीन आयफोन डिव्हाईस घ्यावा लागणार आहे.
WhatsApp चा सपोर्ट आयफोनच्या नमूद डिव्हाईससाठी ५ मे २०२५ नंतर संपूर्णपणे समाप्त होणार आहे. म्हणजे या तारखेनंतर जुने आयओएस व्हर्जनवाले आयफोनवर व्हॉटसअप अजिबात चालणार नाही. जर तुम्हाला विना व्यत्यय व्हॉट्सअपचा वापर करायचा असेल तर वेळेतच आपल्या डिव्हाईसला अपडेट किंवा अपग्रेट करावे लागणार आहे.