नवी दिल्ली : डेटा प्रायव्हसीच्या वादावर आता 4 आठवड्यानंतर WhatsApp कडून एक स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. WhatsAppच्या मालकीची असलेल्या फेसबूककडे UPI ट्रान्झॅक्शन डेटाचा एक्सेस नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आपल्या यूजर्सचा डेटा फेसबूकसोबत शेअर करणार असल्याचं WhatsApp ने यापूर्वी सांगितलं होतं.(WhatsApp’s explanation that Facebook does not have access to UPI transaction data)
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, WhatsApp ने सांगितलं आहे की, UPI transactions डेटा हा इनक्रिप्टेड असतो आणि फेसबूकडे या डेटाचा एक्सेस क्लिअर फॉरमॅटमध्ये नसतो. WhatsApp बाबत अपडेत देणारी वेबसाईट WABetaInfo ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की, यूपीआई आधारित पेमेंट सर्विस पूर्णपणे वॉट्सऐप इंडिया पेमेंट प्रायव्हसी पॉलिसी अंतर्गत येते आणि यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. जर कुठल्या कारणामुळे WhatsApp प्रायव्हसी पॉलिसी आणि WhatsApp इंडिया पेमेंट प्रायव्हसी पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास तर UPI पेमेंट डेटावर WhatsApp India Payments Privacy चा संपूर्ण अधिकार असेल.
गेल्या महिन्यात WhatsAppची नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यात आली आहे. त्यावेळी यूजर्सचा डेटा पॅरेंट कंपनी अशलेल्या फेसबूकला शेअर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. WhatsAppच्या या बदलामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. वाढता विरोध पाहून कंपनीने तूर्तास याची डेडलाईन वाढवली आहे. सुरुवातीला 8 फेब्रुवारी असणारी डेडलाईन आता मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. WhatsAppने सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला APP वापरायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत नव्या बदलांचा स्वीकार करावा लागेल. त्यात यूजर्सचा डेटा फेसबूकला देण्याबाबतचा बदल करण्यात येणार आहे.
मार्क झुकरबर्गने WhatsAppच्या नव्या पॉलिसीचं समर्थन केलं आहे. या APP मध्ये व्यवसायाशी संबंधित देवाणघेवाण सुलभ बनवण्याचा उद्देश असल्याचं झुकरबर्ग यांचं म्हणणं आहे. ‘आम्ही WhatsAppमध्ये व्यवसायाशी संबंधित देवाणघेवाण सुलभ वनवण्यासाठी नव्या सुविधा निर्माण करत आहोत. आम्ही आमच्या सुरक्षित इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करुन व्यवस्याला चालना देणारे आणि WhatsApp चॅट मॅनेज करण्यासाठी नवे टूल्स निर्माण करत आहोत. जर तुम्हाला हे आवडलं नाही तर क्लाऊड प्रोव्हायर्ड्ससोबत व्यवसाय करण्यापासून वाचा, WhatsApp पासून वाचण्याची काही आवश्यकता नाही’ असं झुकरबर्ग यांनी गुरुवारी दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
व्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
तुम्ही व्हॉटसअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
WhatsApp’s explanation that Facebook does not have access to UPI transaction data