पवन दावुलुरी (Pavan Davuluri) मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचे नेतृत्व करतील. पवन यांच्या खांद्यावर मायक्रोसॉफ्ट विंडोस सरफेसची (Microsoft Windows Surface) जबाबदारी असेल. आयआयटी मद्रास येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. या पदावर पूर्वी पनोस पानाय हे होते. आता त्यांच्या जागी पवन यांची वर्णी लागली आहे. पानाय यांनी गेल्यावर्षी मायक्रोसॉफ्टला टाटा बायबाय करत ॲमेझॉनची वाट चोखंदळली. मायक्रोसॉफ्टने यापूर्वीच विंडोज आणि सरफेस असे वर्गीकरण केलेले आहे. या दोघांचे नेतृत्व वेगवेगळ्य व्यक्तीकडे होते. पवन पूर्वी सरफेस Silicone चे काम पाहत होते.
कोण आहेत पवन दावुलुरी?
मीडिया वृत्तानुसार, पवन दावुलुरी यांनी आयआयटी मद्रास येथून पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मॅरीलँड विद्यापीठातून पदवी मिळवली आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ते रुजू झाले. ते गेल्या 23 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टशी जोडलेले आहेत. त्यांचे भारताशी खास नाते आहे. पवन आता नेतृत्व करणाऱ्या त्या समूहात सामील झाले आहेत. जिथे अगदी बोटावर मोजण्याइतके भारतीय आहेत, जे अमेरिकेन कंपन्यात नेतृत्व करत आहेत. यामध्ये सत्य नडेला आणि सुंदर पिचाई यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. पवन यांना मायक्रोसॉफ्ट विंडोचा कारभार सोपविल्यानंतर त्यांचा पगार किती हे काही समोर आलेले नाही.
भारतीयाकडेच रिपोर्टिंग
या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट विडोंजचे पवन हे, मायक्रोसॉफ्टचे हेड आणि या विभागाचे प्रमुख राजशे झा यांच्याकडे त्यांचा कार्यपालन अहवाल सोपवतील. राजेश झा यांच्या एका पत्रामुळे या नियुक्तीचा आणि पवन यांच्याविषयीचा खुलासा समोर आला आहे. कंपनीने पवन दावुलुरी यांच्या नियुक्तीचा निर्णयाची माहिती या पत्रात देण्यात आली होती.
सत्य नडेला, क्लाऊड गुरु
सत्य नडेला यांना क्लाऊड गुरु म्हणून पण ओळखले जाते. मायक्रोसॉफ्टमध्ये क्लाऊड कम्युटिंगचे नेतृत्व त्यांनी केले. कंपनीला जगातील सर्वात मोठे क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमधील एक करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये बिझनेस डिव्हिजनमध्ये उपाध्यक्ष पदावर काम केले. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे डेटाबेस, विंडोज सर्व्हर आणि डेव्हलपर टूल्सला मायक्रोसॉफ्ट अज्योर क्लाऊड प्लॅटफॉर्मवर आणण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली.