मुंबई : बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल (Mobile) बघण्याची सवय असते. बरेच जण रात्री झोपण्यापूर्वीही मोबाईल चेक करत असतात. मात्र काही व्यक्ती रात्री मोबाईल त्यांच्या शेजारी अथवा उशीखाली ठेवून झोपतात(while sleeping). बहुतांश लोक त्यांच्या उशीखालीच मोबाईल ठेवतात, की फोन वाजला तर लगेच उचलता येईल. मात्र ही सवय किती हानिकारक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? झोपताना उशीखाली मोबाईल ठेवण्याची (side-effects of mobile) सवय केवळ धोकादायक नव्हे तर त्यामुळे तुमच्या झोपेतही व्यत्यय निर्माण होऊ शकतो. उशीखाली फोन ठेवून झोपल्यास काय नुकसान होते, हे जाणून घेऊया.
झोपताना उशीखाली ठेवू नका फोन –
उशीखाली मोबाईल घेऊन झोपण्याचे अनेक तोटे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत अनेक प्रकारचे संशोधन केले आहे. 2011 मध्ये यासंबंधी करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, मोबाईल उशीखाली ठेवून झोपल्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी नेहमी आपल्यासोबत राहते, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. हे मोठ्या व्यक्तींपेक्षा मुलांसाठी जास्त हानिकारक आहे.
ब्ल्यू लाइटमुळे होते नुकसान –
जेव्हा आपण मोबाईल उशीखाली ठेवतो आणि झोपतो, तेव्हा त्याच्या ब्ल्यू लाइटमुळे त्रास होतो. जेव्हा फोन व्हायब्रेट होतो किंवा त्याची रिंगटोन वाजते, तेव्हा आपण तो लगेच बघतो. अशा परिस्थितीत पुन्हा पुन्हा अंधारात मोबाईल पाहून आपले डोळे खराब होतात.
आग लागण्याची भीती –
उशीखाली फोन ठेवून झोपण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे मोबाईल फोन गरम झाल्यास व तो उशीखाली ठेवला तर त्याला आग लागण्याचा धोका असतो. बऱ्याच व्यक्ती त्यांचा फोन चार्जिंगला लावून झोपतात, ही गोष्टही खूप धोकादायक ठरू शकतात.
झोपेत येतो व्यत्यय –
संशोधनानुसार असे समोर आले आहे की , (रात्री) फोनच्या रिंग वाजल्यामुळे केवळ एक दिवसाची झोप बिघडच नाही तर तुमच्या झोपेच्या पॅटर्नमध्येही व्यत्यय येऊ शकतो. मोबाईल उशीखाली ठेवून झोपल्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी नेहमी आपल्यासोबत राहते, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे झोप होऊनही तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते.