नवी दिल्ली | 15 February 2024 : आता छोटी रक्कम काढण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीन शोधण्याची गरज नाही. त्यांना सोबत त्यांचे डेबिट वा क्रेडिट कार्ड बाळगण्याची पण गरज नाही. एका ओटीपी आधारे तुम्हाला रक्कम मिळू शकते. व्हर्च्युअल एटीएम तुमची पैशांची चणचण दूर करेल. विशेष म्हणजे त्यासाठी मोठी रक्कम काढण्याची गरज नाही. छोटी रक्कम तुम्हाला काढता येईल. सध्या युपीआयचे प्रचलन वाढले आहे. अगदी खेड्यात पण तुम्हाला युपीआय कोड सहज मिळून जाईल. पण युपीआयच्या वाढत चाललेल्या फसवणुकीमुळे अनेक जण पण रोख रक्कम स्वीकारण्यावर भर देत आहे. शहरातही असाच प्रकार पहायला मिळतो. अनेक दुकानदार रोखीत व्यवहार करतात. अशावेळी डेबिट कार्ड सोबत नसेल, रोख रक्कम नसेल तर अडचण होते. व्हर्च्युअल एटीएम काय आहे, त्याचा वापर कसा करता येईल, कुठे मिळेल ही रक्कम, जाणून घ्या
या कंपनीचा उपाय
पेमार्ट इंडियाने छोट्या रक्कमेबाबत मोठी भूमिका घेतली आहे. चंदीगड येथील या फिनटेक कंपनीने व्हर्च्युअल, कार्डलेस आणि हार्डवेअर-लेस कॅश विदड्रॉल सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना आता रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीन शोधण्याच्या भानगडीत पडायचे काम नसेल. तर त्याच्याकडे डेबिट कार्ड नसले तरी रोख रक्कम काढता येणार आहे. रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना पिन क्रमांकाची गरज नसेल. पण त्यांना एक ओटीपीची गरज असेल. पेमार्ट इंडिया प्रायव्हेट कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अमित नारंग या सेवेला व्हर्च्युअल एटीएम असे म्हणतात.
कसा करता येईल व्हर्च्युअल एटीएमचा वापर