नवी दिल्ली : आज 31 मार्च हा दिवस जागतिक बॅकअप दिन (World Backup Day) म्हणून साजरा केला जातो. हा केवळ तुमचा वैयक्तिक डेटा बॅकअप घेण्याची आठवण करून देण्याचा दिवस नाही. स्मार्टफोनने (smartphone)आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या स्थानी आहे. फोन हे केवळ संवादाचे साधन राहिले आहे, परंतु बँकिंग डिटेल्स, ओळखपत्रं, फोटो, व्हिडिओ (important data) अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यात असतात. अशा परिस्थितीत आज जागतिक बॅकअप दिनानिमित्त काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, ज्या तुम्ही दररोज करत राहिल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा महत्त्वाचा डेटा नेहमी सुरक्षित राहील.
फोनमध्ये ऑटोमॅटिक क्लाऊड बॅकअप एनेबल ठेवा
अँड्रॉईड आणि Apple iPhone हे दोन्ही वापरकर्त्यांसाठी इन-बिल्ट क्लाउड बॅकअपचे फीचर ऑफर करतात. Android चे युजर्स Google ड्राइव्ह वापरू शकतात तर Apple चे युजर्स त्यांच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी iCloud आधारित बॅकअप वापरू शकतात. गुगल ड्राइव्हसह इतर ॲप्स देखील वापरकर्त्यांना स्वयंचलित अथवा ऑटोमॅटिक बॅकअपचा पर्याय देतात, पण हे अनेकांना माहिती नसते.
अकाऊंट पासवर्डचा बॅकअप जरूर ठेवा
आपल्या डिव्हाइसमध्ये असलेल्या डेटाचा बॅकअप घेणे हे प्रत्येकाचे लक्ष असते, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाचे पासवर्ड वेगवेगळे असतात आणि प्रत्येक पासवर्ड लक्षात ठेवणे नेहमीच शक्य नसते. अशा स्थितीत तुमच्या महत्त्वाच्या पासवर्डचा बॅकअप ठेवणे योग्य ठरते आणि त्यासाठी तुम्ही पासवर्ड मॅनेजमेंट टूल वापरू शकता.
फोटो व व्हिडीओचा बॅकअप घेणे अत्यंत महत्वाचे
केवळ व्हिडिओच नाही तर फोटो देखील डिव्हाइसमध्ये भरपूर स्टोरेज घेतात, हे खरं आहे. अशा परिस्थितीत, डिव्हाइस कधीही क्रॅश झाल्यास किंवा कोणत्याही परिस्थितीत खराब झाल्यास, तुमचा सध्याचा डेटा सुरक्षित असेल, याची काही खात्री नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही ऑनलाइन क्लाउड स्टोरेज किंवा पेन ड्राइव्ह, हार्ड ड्राइव्ह, एसएसडी स्टोरेज इत्यादी वापरून फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप ठेवा, असा सल्ला दिला जातो.
बॅकअपसाठी हे डिव्हाइस ठरतील उपयुक्त
WD My Passport HDD डिव्हाइसची Amazon वर किंमत 9,699 रुपये आहे, सॅनडिस्क एक्स्ट्रीम पोर्टेबल SSD V2 डिव्हाइसची किंमत 21,900 रुपये इतकी आहे आणि सॅनडिस्क अल्ट्रा ड्युअल ड्राइव्ह गो USB फ्लॅश ड्राइव्हची किंमत 979 रुपये इतकी आहे. एवढेच नव्हे तर त्याशिवाय इतरही अनेक उपकरणे आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या डेटाचा बॅकअप तुमच्याकडे ठेवू शकता.