सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे. या सोशल मीडिया मालक एलॉन मस्क याने एक्सवर एडल्ट अथवा पोर्न कंटेट पोस्ट करण्यास, अपलोड करण्यास मंजुरी दिली आहे. एलॉन मस्क याने यापूर्वी दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, खास करुन इन्स्टाग्रामवर न्यूडिटी, नग्नतेला प्रोत्साहन देण्याचा ठपका ठेवला आहे. असा प्रौढ कंटेट कोणी पाहावा, कोणी नाही, याविषयीच्या मार्गदर्शक सूचना पण एक्सने जाहीर केल्या आहेत. भारतात सर्व प्रकारच्या पोर्न वेबसाईट बॅन आहेत. त्यामुळे भारतात एक्स बॅन होणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
न्युडिटी हॅशटॅगची चलती
गेल्या आठवड्यात शनिवारी एक्सवर न्यूडिटीविषयीचा एक हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. ज्या दिवशी भारतात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल आला. त्या दिवशी सकाळी काही तासांपर्यंत एक्सवर न्यूडिटीविषयीचा शब्द ट्रेंड करत होता. त्यासाठी जवळपास 40 लाख हॅशटॅगचा वापर करण्यात आला.
अर्थात या हॅशटॅगवर क्लिक केल्यावर केवळ एक अश्लील खाते समोर येत होते. विशेष म्हणजे हे अश्लील अकाऊंट व्हेरिफाईड होते. लेटेस्ट पोस्टवर क्लिक करताच सातत्याने अश्लील कंटेंट दिसत होता. हे खाते किती तरी तास टॉप ट्रेंड करत होते. त्यानंतर ते हटविण्यात आले. अर्थात हे खाते अजूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे. त्यावरचा कंटेंट पण तसाच आहे.
काय आहेत मर्यादा
एक्सने एडल्ट कंटेंटसाठी काही मर्यादा आणि मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. अल्पवयीन मुला-मुलींना हा कंटेंट दिसू नये यासाठी मर्यादा असतील. ज्यांना हा कंटेंट नको आहे, त्यांना पण हा कंटेंट दिसणार नाही. जे लोक नियमीतपणे असे व्हिडिओ अपलोड करतील, त्यांना सेन्सिटीव्ही मार्क करावे लागेल. असे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वयाची पडताळणी करावी लागेल.
We have launched Adult Content and Violent Content policies to bring more clarity of our Rules and transparency into enforcement of these areas. These policies replace our former Sensitive Media and Violent Speech policies – but what we enforce against hasn’t changed.
Adult…
— Safety (@Safety) June 3, 2024
तर होईल कारवाई
जे युझर्स या मार्गदर्शक तत्वांचा, नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर एक्स कारवाई करणार आहे. एखाद्या युझर्सने अशा आशयाचा कंटेंट एक्सवर अपलोड करताना जर प्रौढ कंटेंट हे लेबल लावले नाही तर फिल्टरमध्ये असा कंटेंट आपोआप हटविण्यात येईल. पण त्याने याविषयीचे लेबल लावल्यानंतर त्यावर कारवाई होणार नाही.
कोणाला पण असा कंटेंट अपलोड करता येणार नाही. तुमच्या वयाची पडताळणी झाल्याशिवाय युझर्सला असा कंटेंट अपलोड करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. युझर्स अशा प्रकारची त्याची कम्युनिटी ही खासगी श्रेणीत ठेऊ शकतो. या कम्युनिटीचा, भाग होण्यासाठी अर्थातच वयाचा पडताळा आणि ॲडमीनची परवानगी लागेल.