नवी दिल्ली : Xiaomi या चीनच्या स्मार्टफोन कंपनीचे 13 लाख रुपयांच्या बनावट वस्तू जप्त केल्या (Xiaomi product seized) आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली (Xiaomi product seized) आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी गफ्फार मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून या बनावट वस्तू जप्त केल्या (Xiaomi product seized) आहेत.
Xiaomi ने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, 15 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांना बनावट वस्तू विक्रेत्यांची तक्रार मिळाली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी गफ्फार मार्केटमध्ये छापेमारी केली. त्यावेळी 13 लाख रुपये किंमतीचे बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या. यात शाओमीचे 2000 पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश आहे.
दिल्ली पोलिसांनी गफ्फार मार्केटमधील चार दुकानात छापेमारी केली. त्यावेळी या दुकानात शाओमी कंपनीच्या हुबेहुब पण बनावट वस्तू आढळल्या. बनावट वस्तूंमध्ये Mi Power Banks, Mi Necbands, Mi Travel Adaptor, Mi Earphones Basic, Mi Wireless Headsets, Redmi Air Dots या वस्तूंचा समावेश (Xiaomi product seized) आहे.
या सर्व बनावट वस्तू हे दुकानदार गेल्या वर्षभरापासून विकत होते. या बनावट वस्तूंचा फटका अनेक ग्राहकांनाही बसत होता. तसेच याचा फटका कंपनीलाही होत होता. दरम्यान सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु आहे.
यानंतर सावधागिरी बाळगत Xiaomi ने ग्राहकांना बनावट वस्तू कशा ओळखाल? याबाबतची माहिती दिली (Xiaomi product seized) आहे.