नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : Xiaomi पुन्हा बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. Redmi Note 13 pro plus ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रेडमी नोट 13 सीरीजचा नवीन फोन बाजारात येत आहे. हा स्मार्टफोन यापूर्वी चीनमध्ये ग्राहकांच्या हाती आला आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने तो बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. जगातील अनेक देशात हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. पुढील वर्षांच्या सुरुवातीलाच, जानेवारी 2024 मध्ये Redmi Note 13 pro plus चा हँडसेट ग्राहकांच्या हाती असेल. यामध्ये 5000mAh ची बॅटरी, 120W चे फास्ट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसर मिळेल. जाणून घ्या काय आहेत, या स्मार्टफोनचे फीचर्स…
भारतात केव्हा दाखल होणार हा स्मार्टफोन
कंपनीने Redmi 13C च्या लाँचिंग दरम्यान नवीन Redmi Note 13 Pro Plus झलक दाखवली होती. हा फोन येत्या जानेवारीत भारतीय बाजारात दाखल होत आहे. कंपनीने अजून लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही. Redmi 13C चा लाँचिंग इव्हेंट Redmi Note 13 pro plus च्या दमदार कॅमेऱ्यात शूट करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा कॅमेरा असेल.
काय आहेत फीचर्स