शाओमीचा लवकरच 48 मेगापिक्सल कॅमेराचा फोन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : शाओमी सुरुवातीपासून बजेटमध्ये आणि ग्राहकांना आवडतील असे स्मार्टफोन बाजारात आणत आहे. शाओमीने आतापर्यंत अनेक नव-नवीन फीचर ग्राहकांसाठी आणले आहेत. मात्र यंदा शाओमी 48 मेगापिक्सलचा फोन बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे नक्कीच हा फोन इतर कंपन्याना टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शाओमीचे अध्यक्ष लिन बिन यांनी वीबोवर एक पोस्ट केली […]

शाओमीचा लवकरच 48 मेगापिक्सल कॅमेराचा फोन
Follow us on

मुंबई : शाओमी सुरुवातीपासून बजेटमध्ये आणि ग्राहकांना आवडतील असे स्मार्टफोन बाजारात आणत आहे. शाओमीने आतापर्यंत अनेक नव-नवीन फीचर ग्राहकांसाठी आणले आहेत. मात्र यंदा शाओमी 48 मेगापिक्सलचा फोन बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे नक्कीच हा फोन इतर कंपन्याना टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शाओमीचे अध्यक्ष लिन बिन यांनी वीबोवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लवकरच 48 मेगापिक्सलचा फोन लाँच केला जाईल. तसेच त्यांनी हा स्मार्टफोन जानेवारी 2019 मध्ये लाँच करणार असल्याचं सागिंतलं आहे. यानंतर MIUIनेही अधिकृतपणे घोषणा करत येणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये MIUI 10 सिस्टीम असेल आणि ‘अँड्रॉईड पाय’ व्हर्जन दिला जाऊ शकतो.

बिनने यावेळी एक फोटोही शेअर केला आहे यामध्ये एक स्मार्टफोन दिसत आहे. ज्याचा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. एलईडी फ्लॅशसोबत सेंसरही दिसत आहे. गिज चायनाच्या एका रिपोर्टनुसार बिन यांनी असे ही सांगितले की, जर हा 48 मेगापिक्सलचा फोन वास्तवात यशस्वी झाला तर आम्ही Huawei ला ही टक्कर देऊ शकतो. Huawei 20 प्रो आणि पी20 मध्ये 40 मेगापिक्सलचा कॅमेरा देत आहेत.

शाओमी 48 मेगापिक्सलसाठी CMOS सेंसरचा वापर करु शकते, आतापर्यंत या सेंसरचा वापर पहिल्यांदाच सोनी आणि सॅमसंगच्या मदतीने केला आहे. या सेंसरमध्ये 4k व्हिडीओला 90 फ्रेम्स प्रति सेंकड रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे.