मुंबई, तुम्ही जर स्मार्टफोनचे चाहते आहात आणि त्यात कॅमेरा फिचर तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर या स्मार्टफोनबद्दल तुम्ही नक्की चिचार कराल. Xiaomi लवकरच 200MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी त्याची Xiaomi 12T सीरीज पुढील आठवड्यात लॉन्च करणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी स्टँडर्ड आणि प्रो हे दोन स्मार्टफोन व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. प्रो व्हेरियंटमध्ये, तुम्हाला 200MP कॅमेरा सेटअप मिळेल. जाणून घेऊया त्याचे तपशील.
Xiaomi दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या नवीन प्रोडक्ट्ला कंपनी त्यांना Xiaomi 12T सीरीज अंतर्गत लॉन्च करेल. त्यांची नावे Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro असतील. कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन 4 ऑक्टोबरला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
भारतात हे मॉडेल कधी लॉन्च होतील याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. 4 ऑक्टोबर रोजी कंपनी भारतात रेडमी टॅब्लेट लॉन्च करत आहे. कंपनी Xiaomi 12T सीरीजबद्दल जास्त माहिती दिलेली नाही, परंतु याच्याशी संबंधित अनेक लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत.
नुकत्याच लीक झालेल्या तपशीलांमध्ये, फोनचे डिझाइन आणि मुख्य वैशिष्ट्ये समोर आली आहेत. 200MP कॅमेरा हे या सीरिजचे वैशिष्ट्य असणार आहे. चला जाणून घेऊया या फोनमध्ये काय खास असू शकते.
Xiaomi च्या आगामी दोन्ही फोन्सची रचना सारखीच असेल. दोघांमधील मुख्य फरक हा हार्डवेअर असेल. रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 12T ला MediaTek Dimensity 8100 चिपसेट मिळेल. यामध्ये 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, जो 8MP आणि 2MP च्या दोन लेन्ससह येईल.