Year Ender 2024 : गुगलबाबाकडून या वर्षात काय मिळाले ज्ञान; Google वर सर्वाधिक काय केले सर्च?

| Updated on: Dec 11, 2024 | 5:01 PM

Most Search Topics on Google : सध्या व्हॉट्सॲप यूनिव्हर्सिटीचा बोलबोला आहे. त्याहून अधिक युट्यूब आणि गुगल सर्चला महत्त्व आहे. तर या वर्षात गुगलवर सर्वाधिक काय सर्च करण्यात आले तुम्हाला माहिती आहे का? हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च झाला, या गोष्टी सर्च करण्यात आल्या

Year Ender 2024 : गुगलबाबाकडून या वर्षात काय मिळाले ज्ञान; Google वर सर्वाधिक काय केले सर्च?
गुगल सर्च
Follow us on

आपल्याला चटकन काही माहिती हवी असेल तर आता आपल्याकडे गुगलचा हक्काचा पार आहे. या पारावर एकदा का तुम्ही फतकल मारली की हवी ती माहिती क्षणार्धात तुमच्या पुढ्यात येऊन पडते. त्यात तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टींची लांबलचक यादीच तुमच्यासमोर दाखल होते. तुम्ही केवळ शब्द टाईप करायची, आता तर उच्चारायचा उशीर की क्षणात माहितीचा महापूर तुम्हाला वेढून टाकतो. राजकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, एखादा विषय, निसर्ग, खेळ, चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, विज्ञान, देश, पर्यटन स्थळ अशी ही अगणित यादी आहे. यावर्षात 2024 मध्ये गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या. त्यात या गोष्टी सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्या आहेत.

चेंडू-फळीने पटकावले स्थान

या वर्षात 2024 मध्ये सर्वाधिक काय सर्च करण्यात आले याची यादीच गुगलने जाहीर केली आहे. गुगलवर एका मिनिटाला जगभरात अनेक गोष्टी शोधल्या जातात. एकाचवेळी लाखो लोक गुगलवर काही ना काही गवसत असतात. या ऑनलाईन कुंभमेळ्यात हवसे, नवसे आणि गवसे एकाच वेळी पडीक असतात. मनात आले की केले गुगल असा हा सर्व मामला आहे. तर या सर्चमध्ये सर्वाधिक वेळा क्रिकेट हा विषय धुंडाळण्यात आला आहे. चेंडू-फळीने पहिले स्थान पटकावले.

हे सुद्धा वाचा

या की-वर्डचा सर्वाधिक वापर

यंदा गुगल बाबावर Indian Premier League आणि T20 World Cup हे सर्वाधिक वेळा शोधल्या गेलेले की-वर्ड होते. क्रिकेटने गुगलचे सर्च प्लॅटफॉर्म व्यापून टाकला होता. तर लोकसभा निवडणूक आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांनी गुगलवर धुमाकूळ घातला. या काळात भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतर निवडणूक निकाल हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर तर ऑलिम्पिक स्पर्धा हा सर्वाधिक शोधला गेलेल्या टॉप 5 मधील सर्च की-वर्ड होता.

अझरबैजान देश सर्वाधिक सर्च

कोविडनंतर अजूनही पर्यटन क्षेत्राला मोठ्या लाटेची प्रतिक्षा आहे. जगभरात पर्यटकांच्या फिरस्तीवर मोठा परिणाम झालेला आहे. पर्यटकांची संख्या एकदमच रोडवली नसली तरी कमी झालेली आहे. तर काही ठिकाणांना मात्र पर्यटकांनी आवर्जून भेट दिली आहे. जगभरात अनेकांना वाटत असेल की स्वित्झर्लंड अथवा अमेरिका या देशांना भेट देणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल. पण तसे नाही.

गुगल सर्चवर अझरबैजान हा देश सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आला. तर त्यानंतर बाली, मनाली ही पर्यटन स्थळं शोधण्यात आली. चौथ्या क्रमांकावर कझाकस्तानचा सर्च करण्यात आला. तर पाचव्या क्रमांकावर जयपूर या शहराने बाजी मारली. त्यानंतर जॉर्जिया, मलेशिया, अयोध्या, काश्मीर आणि दक्षिण गोवा हे की-वर्ड सर्च करण्यात आले.

ऑल आयज ऑन राफा या शब्दाला सर्वाधिक पसंती

यंदा भारतीयांनी गुगल सर्चमध्ये ऑल आयज ऑन राफा हा कीवर्ड सर्वाधिक वेळा सर्च केला. तर त्यानंतर सर्वाईकल कॅन्सर, तवायफ आणि डेम्यूर हे शब्द शोधण्यात आले. याशिवाय दोन चित्रपटांनी गुगलवर राहुटी ठोकल्याचे दिसले. यामध्ये स्त्री 2 आणि कल्की 2898 AD या सिनेमांची हवा दिसून आली. त्याचा सर्वाधिक वेळा शोध घेण्यात आला.