Viral Video | बाप-लेकाचं नातं हे कोणत्याही शब्दात बांधता न येणार असं नातं असतं. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली की त्याला मित्रासारखा वागवावं, असं म्हणतात. मुलगा कितीही मोठा होवोत, बापासाठी तो लहानच असतो. बाप वरुन कितीही कठोर असला, तरीही तो आतून म्हणजेच मनातून फार हळवा असतो. बाप लेकाच्या नात्यावर भाष्य करणारी अशी अनेक वाक्य, सुभाषितं आहेत. सोशल मीडियावर एका बाप-लेकाचा व्हीडओ व्हायरल होतोय. हा व्हीडिओ पाहून तुमच्याही डोळ्यातही अश्रू येतील.
हा व्हीडिओ गूडपर्सनस्रिनी या ट्विटर हँन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. “वडिलांचं वय 100 वर्ष आणि मुलाचं वय 75 वर्ष. येणारी पिढी येणारी पिढी अशी नाती जपू शकेल का?” अशा कॅप्शनने हा व्हीडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हीडिओत बाप लेकाची जोडी दिसतेय.यात बाप हा अंथरुणात झोपलेला आहे.तर मुलगा हा आपल्या वडिलांसोबत बोलतोय.
बाप-लेकाची अनोखी केमिस्ट्री
Father is 100+, son is 75. Can the coming generation sustain such relationships ? pic.twitter.com/QHhcqBSOnC
— Tweet-today?? (@goodpersonSrini) February 16, 2023
दोघंही एकमेकांसोबशी काही तरी बोलतायेत. जेव्हा वडिलांना सांगितलं कळत नाहीत तेव्हा मुलगा वडिलांच्या कानाजवळ जाऊन सांगण्याता प्रयत्न करतो. या दरम्यान तोंडाने शिट्टी वाजवून गाणी ऐकावतो. यानंतर वडील आपल्या लेकाला विचारतात की हे कोणत्या गाण्यातील शब्द आहेत. या व्हीडिओत एक महिला आणि मुलगीही दिसून येत आहे.