पाय ठेवताच मोजावे लागतात 1 लाख, नंतर भारतीयांना या देशात मिळते एंट्री

| Updated on: Oct 29, 2023 | 3:33 PM

Tourism El Salvador | अधिकृत संकेतस्थळानुसार, भारतासह 50 आफ्रिकी-आशियाई देशांतील पर्यटकांना या देशाच्या जमिनीवर पाऊल ठेवल्या ठेवल्या जवळपास एक लाख मोजावे लागतात. तरच या देशात त्यांना फिरण्यासाठी परवानगी मिळते. हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या देशातील नयनरम्य ठिकाणं पर्यटकांना भुरळ घालतात.

पाय ठेवताच मोजावे लागतात 1 लाख, नंतर भारतीयांना या देशात मिळते एंट्री
Follow us on

नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : जगभरात अनेक पर्यटक डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी फिरतात. तिथली संस्कृती जवळून पाहतात. भाषा, नृत्यू, खाद्य संस्कृतीचा अस्वाद घेतात. काहींचा जन्मच जणू जिप्सी म्हणून होतो. पाठिशी एक छोटी सॅग घेऊन ते जग भ्रमंती करतात. तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाने पर्यटकांचा मात्र हिरमोड केला आहे. हा छोटा देश पण निसर्गाने त्याला भरभरुन संपदा दिली आहे. निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांना जवळपास एक लाख रुपये मोजावे लागणार आहे. भारतासह 50 आफ्रिकी-आशियाई देशांतील नागरिकांना या देशात फिरण्यासाठी शुल्क अदा करावे लागणार आहे.

भारतासह 50 पासपोर्टवर कर

फोसेंकाच्या आखातात वसलेला हा टुमदार अल सल्वाडोर (El Salvador) जगातील पर्यटकांना आकर्षित करतो. ऑक्टोबरच्या सुरुवातीला या देशाने नवीन कर प्रणाली लागू केली आहे. या ठिकाणी पर्यटकांकडून कर वसूली होत आहे. अल सल्वाडोरच्या बंदर प्राधिकरणाने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार भारतासह 57 आफ्रिकी-आशियायी देशांमधील पासपोर्टवर येणाऱ्या पर्यटकांना 1000 डॉलर वा जवळपास 83,000 रुपये शुल्क अदा करावे लागेल. त्यात स्थानिक कर वेगळा मोजावा लागेल.

हे सुद्धा वाचा

क्रिप्टोकरन्सीचा वापर

अल सल्वाडोर येथील अनेक पर्यटनस्थळावर क्रिप्टोचा सर्रास वापर करण्यात येतो. या देशातील नागरिक क्रिप्टोचा स्वीकार करतात. या ठिकाणी व्यवहारात त्याचा वापर होतो. येथील नागरिक क्रिप्टो करन्सीतून भाजीपाला, किराणा भरतात. सरकारी आणि इतर बिलाचा भरणा करण्यासाठी क्रिप्टोच्या वापराला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.  पर्यटकांना पण क्रिप्टोचा वापर करता येतो.  पर्यटकांकडून कर वसूल केल्यानंतर ही रक्कम विकास कामासाठी वापरण्यात येईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे.

First Bitcoin City

या देशात क्रिप्टो करन्सीला अधिकृत मान्यताच दिली असे नाही तर जगातील पहिली First Bitcoin City पण या देशात तयार होत आहे. या देशाचे राष्ट्रपती नायब बुकेले यांनी मध्य अमेरिकेतील या देशात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी क्रिप्टोचा वापर वाढवला आहे. पण त्यासाठी या देशाच्या काही अटींचा सामना करावा लागतो. पर्यटक या देशात त्यानुसारच क्रिप्टोचा वापर करु शकतात.