Food challenge video : विविध चॅलेंजेस घ्यायला कोणाला नाही आवडत? त्यातही जर चॅलेज स्वीकारलं आणि बक्षीस मिळणार असेल तर मग तर सोने पे सुहागाच. सोशल मीडियावर (Social media) आपण चॅलेंजेसचे विविध व्हिडिओ पाहत असतो. यात कमी वेळेत आपल्याला दिलेले काम पूर्ण करायचे असते. एखादे कोडे सोडवायचे असते किंवा एखादा खेळ असतो, जो नियमानुसार पूर्ण करायचा असतो. सर्वांच्या आवडीचे चॅलेंज असते ते म्हणजे एखादा खाद्यपदार्थ दिलेल्या वेळेत खाणे. याचा दुहेरी फायदा असतो. एकतर खायलाही मिळते आणि पैसेही… अलिकडेच पाणीपुरी खाण्याच्या चॅलेजचा एक विनोदी व्हिडिओ व्हायरल झाला होता. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालाय. मात्र खाण्याचा नाही, तर बनवण्याचा आहे. सोडावॉटर शिकंजी (Soda Shikanji) बनवण्याचा हा व्हिडिओ आहे.
व्हिडिओमध्ये आपल्याला सोडावॉटर ड्रिंक विकणारा एक व्यक्ती दिसत आहे. चॅलेंज देणारा व्यक्ती त्याला एक चॅलेंज देतो, ते म्हणजे 20 सेकंदांत सोडावॉटर शिकंजी बनवण्याचे. विक्रेताही ते चॅलेंज स्वीकारतो. मग तो लिंबू पिळून घेतो, त्यानंतर त्यात इतर सर्व पदार्थ टाकतो, जे सोड वॉटर शिकंजीसाठी आवश्यक आहेत. तिकडे काउंटडाऊन सुरूच असते. यादरम्यान तो बनवत असलेली सोडावॉटर शिकंजी सांडता सांडता राहते. शेवटी 20 सेकंदांहून थोडा जास्त कालावधी लागला तरी चॅलेंज देणारा त्याला पैसे देऊ करतो.
हा मजेदार व्हिडिओ यूट्यूबवर फूडी राहुल (FOODY RAHUL) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 13 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 1 मिलियनहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ’20 SECOND Soda Shikanji Challenge 200 Ki Soda Shikanji‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. जसा व्हिडिओ मजेशीर आहे, तशा कमेंट्सही यूझर्सनी मजेशीर केल्या आहेत.