1000 Boyfriends : या जगात अजब-गजब अशा अनेक घटना घडत असतात. बऱ्याच वेळेस त्या ऐकून आपल्याला त्या खऱ्या वाट नाहीत. अशीच एक गोष्ट म्हणजे जॉर्जियामधील एका तरूणीला एक- दोन नव्हे तर हजारो बॉयफ्रेंड (1000 Boyfriends ) आहेत. हे वाचून आश्चर्य वाटलं असेल ना ? पण तुम्ही काही चुकीचं वाचलं नाहीये, हे खरंच खरं आहे. जॉर्जियामधील करिन मार्जोरी ही तरूणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (social media influencer) आहे. कॅरीनचा दावा आहे की तिचे 1,000 बॉयफ्रेंड आहेत. ती तिच्या सर्व प्रियकरांना समान वेळ देते, पण ती ते कसं करते हे जाणून घेणं जास्त मनोरंजक आहे. यासाठी तिने असा जुगाड केला आहे, ज्यामुळे ती आता बक्कळ कमाई करते.
just woke up ☀️ pic.twitter.com/8v4uzFxRsz
— Caryn Marjorie (@cutiecaryn) December 18, 2022
जॉर्जियातील कमिंग येथे राहणारी 23 वर्षीय कॅरीनचे स्नॅपचॅटवर 18 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कॅरिनच्या अनेक चाहत्यांना तिचा बॉयफ्रेंड बनण्याची इच्छा आहे. पण कॅरिनला सर्वांसोबत डेटवर जाणे शक्य नाही. अशा परिस्थितीत, तिने जुगाड करत असा मार्ग शोधला, ज्यातून तिला प्रचंड पैसाही मिळतो.
hey cuties! new video is up! ?
get prom ready with me and see my hair, makeup, and dress!https://t.co/f0g9iSc5D2 pic.twitter.com/boyS4zEWAj— Caryn Marjorie (@cutiecaryn) May 9, 2018
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नुकतेच कॅरिनने तिचे स्वतःचे एआय व्हर्जन CarynAI रिलीज केले आहे, जे फॉलोअर्सना त्यांची गर्लफ्रेंड बनवण्यासाठी एक डॉलर म्हणजेच 82.18 रुपये प्रति मिनिट आकारते. आता तुम्ही अंदाज लावू शकता की, या एका युक्तीने ही तरूणी किती कमाई करत असेल.
कॅरीनच्या सांगण्यानुसार, तिव्ये स्वतःचे बॉट व्हर्जन तयार करण्यासाठी तिने एआय सॉफ्टवेअरवर हजारो तासांचे संभाषण रेकॉर्ड केले आहे. कॅरिनच्या मते, भविष्यात ती तिच्या फॅन्ससोबत बोलताना अनेक खासगी गोष्टीही शेअर करेल.
my first ever beach photoshoot ? pic.twitter.com/ULMj2RWys4
— Caryn Marjorie (@cutiecaryn) December 2, 2022
कॅरीनने सांगितले की, एआय सॉफ्टवेअरद्वारे सध्या ती एक हजार ‘बॉयफ्रेंड्सना’ डेट करत आहे. यासाठी ते (बॉयफ्रेंड्स) तिला तासाला एक डॉलर देत आहेत. जर तिच्या 1.8 दशलक्ष फॉलोअर्सपैकी 20,000 लोकांनी CarynAI साठी साइन अप केले, तर तिचे AI बॉट दरमहा 5 दशलक्ष डॉलर्स (रु. 41 कोटींहून अधिक) कमवू शकतो.