अवघ्या 3 सेकंदात 3 कोटीचं घर गेले वाहून ; व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

| Updated on: Aug 20, 2024 | 8:13 PM

सोशल मीडियावर नेहमी कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याची चर्चाही नेहमी होत असते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायर झाला आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चाही होत आहे. काय आहे या व्हिडीओत? लोक का करत आहेत या व्हिडीओला लाइक? त्यावर टाकलेला हा प्रकाश...

अवघ्या 3 सेकंदात 3 कोटीचं घर गेले वाहून ; व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे विस्फारतील
Follow us on

सी-व्ह्यू असलेलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. समुद्राची गाज ऐकतच जाग यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी काही लोक तर समुद्र किनारी असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामही ठोकतात. काही लोक तर समुद्राच्या किनारी घरच घेतात. निळाशार समुद्र डोळ्यात सामावून घेण्यासाठी त्यांचा हा अट्टाहास असतो. पण त्यांचे हे शौक कधी कधी महागात पडतात. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका व्यक्तीचा स्वप्नांचा बंगला एका क्षणात पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. त्या व्यक्तीचे स्वप्न अवघ्या तीन सेकंदात चक्काचूर होताना दिसत आहे.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे 16 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या ठिकाणी अर्नेस्टो वादळ आलं. त्यामुळे तीन कोटीचं घर समुद्राच्या पाण्यात वाहून गेलं. समुद्राच्या मध्येच हे घर बांधण्यात आलं होतं. पण वादळ आलं, लाटा उसळल्या आणि अवघ्या तीन सेकंदात तीन कोटीचं घर पाण्यात वाहून गेलं. 1973मध्ये कॉर्बिना ड्राइव्हवर हे घर बांधण्यात आलं होतं. आता या ठिकाणी काहीच उरलं नाही. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

3 कोटीत खरेदी

या व्हिडीओत या घराचं देखणं रुप पाहायला मिळत आहे. हे घर नॉर्थ कॅरोलिनाच्या आऊटर बँक्सच्या बेटावर होतं. ते अटलांटिक महासागरात वाहून गेलं. अटलांटिक बेटावर अर्नेस्टो वादळ धडकल्याने ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने 2018 मध्ये 40 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास 3 कोटी रुपये खर्च करून हे घर बांधलं होतं. या घरात चार बेडरूमसह दोन बाथरूम होते. एका शानदार हॉलसह किचनही या घरात होता. Collin Rugg नावाच्या एका अकाऊंटवर या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

यूजर्स काय म्हणाले?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लाखो लोकांनी पाहिला आहे. ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचं लोकांनी म्हटलं आहे. काही सेकंदात तीन कोटींचं घर वाहून गेलं. त्यावर यूजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुखद घटना आहे. पण नशीब घर रिकामं होतं, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. तर पाण्यातील घराची काहीच हमी नाही. दुखी होण्याचं कारणही असलं पाहिजे, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. तर एकाने दुर्देवी घटना म्हणून या घटनेचा उल्लेख केला आहे.