मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा बुलेट चालवत (4 Year Old Rides Royal Enfield In Viral Video) आहे. विशेष म्हणजे बुलेट चालवणं कुणाचंही काम नाही. परंतु त्या मुलाच्या हिंमतीला दाद द्यायला हवी असं वाटतं. बुलेट (Viral Video) ही ३५० किलो वजनाची असते. त्या बुलेटचा (Royal Enfield Classic 350) त्या मुलाने बॅलेन्स केला आहे. त्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे, अशा पद्धतीचा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी नसावा. बुलेट वजनदार असल्यामुळे अनेकजण चालवण्यासाठी पुढे सरकत नाहीत. परंतु एका चार वर्षाच्या चिमुकल्याने (Youngest Rider) हेल्मेट घालून बुलेट चालवून दाखवली आहे.
tranz__moto_hub नावाच्या व्यक्तीने चार वर्षाच्या मुलाचा बुलेट चालवत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो लहान मुलगा बुलेट चालवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्या मुलाचे वडिल त्या मुलाला गाडी चालवत असताना मार्गदर्शन करीत आहेत. तो मुलगा हसत-हसत बुलेट चालवत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी वडिलांनी त्याच्या डोक्यावर हेल्मेट घातलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. पण आम्ही अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याच्या विरोधात आहोत. लहान मुलांसोबत असा धोका पत्करणे धोकादायक ठरू शकते.
त्या व्हिडीओला अडिच लाख कमेंट आल्या आहेत. लोक त्या व्हिडीओला चांगल्या कमेंट करीत आहेत. काही लोकांनी इतक्या लहान मुलाला गाडी चालवायला देऊन जोखीम का ओढावत आहेत अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीले आहे की, मुलाला पहिलं मोठ तरी होऊ द्या.