मुंबई : सध्या कधी कुणावर प्रेमवर (Love) होईल, कोण कुणाशी लग्न करेल याचा अंदाज बांधता येत नाही. जात, धर्म, वय, लिंग असा कुठलाही भेद न मानता लोक प्रेम करतात. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) म्हणतात तसं, सध्या प्रेम हा एक विद्रोह आहे. त्यामुळे सगळे भेद सगळ्या विषमता विसरून लोक प्रेम करत आहेत. अशीच एका अजब लग्नाची गजब गोष्ट सध्या समोर आली आहे. एका 49 वर्षांच्या महिलेने 5 वर्षांच्या मांजरीसोबत लग्न केलंय. यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कारण ही घटना खरी आहे.
‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार या 49 वर्षीय महिलेने नुकतंच लग्नगाठ बांधली. तिने तिच्या पाळीव मांजरीलाच आपलं जीवनसाथी बनवलंय. मोगी असं या मांजरीचं नाव आहे. सिडकपच्या डेबोरा या महिलेने या लग्न समारंभात एक स्मार्ट टक्सिडो परिधान केला होता.तर मोगीसाठीही तिने खास खरेदी केली होती. या विशेष दिवसासाठी तिने आपल्या लागक्या मोगीला बो टाय आणि कॅप घातली होती. त्यांनी लग्नाचे सर्व विधी पूर्ण करत आपल्या सहजीवनाला सुरूवात केली.
A woman has married her pet cat in a civil ceremony to prevent her landlord from forcing her to get rid of the animal.https://t.co/oh7Ob0dcT7 pic.twitter.com/gr8XBBC1kP
— The Mirror (@DailyMirror) April 25, 2022
डेबोराने या लग्नाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. डेबोरा म्हणाली, “माझ्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतं पण मिळवण्यासाठीमात्र खूपकाही होतं. म्हणून मी माझ्या मांजरीशी लग्न केलं. माझं आधीच ठरलं होतं, मला माझ्या मांजरीपासून कधीही वेगळं व्हायचं नव्हतं. कारण मी तिच्यावर खूप प्रेम करते. मी मोगीशिवाय राहू शकत नाही, ती खरोखरच खूप गोड आहे. त्यामुळे मी तिच्या सोबत लग्न केलंय. आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याला सुरूवात करतोय. तुमच्या शुभेच्छा सोबत असू द्या”
Deborah Hodge says that she has had to rehome three animals due to landlords not allowing pets inside their homes.
As a result, she has married her 5-year-old cat to show her landlord how committed she is to her pet. pic.twitter.com/7YUVuJLAqi
— The Mirror (@DailyMirror) April 25, 2022
दक्षिण-पूर्व लंडनमधील एका उद्यानात या महिलेला आढळून आली. तिने तिला घरी आणलं. तिची काळजी घेतली. दोघींची मैत्री बहरत गेली आता या दोघींनी लग्नगाठ बांधली आहे. पण असं एकाद्या महिलेने मांजरीशी लग्नगाठ बांधणं अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं आहे.त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कुणाचं ‘शुभ’ कुणी व्हायचं सावधान? असा सवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.