मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (viral video) होतात. काही व्हिडीओ लोकांना पाहायला आवडतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं संताप व्यक्त करतात. सध्या सोशल मीडियावर (trending news) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला मुलगा काय सांगतोय, हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. अनेक छोट्या मुलांना प्रेम या शब्दाचा अर्थ पटकन समजू लागतो. सध्याची लहान मुलं सगळं काही अगदी फास्ट समजू लागली आहेत. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा त्याच्या दोस्तसोबत बसण्यासाठी हट्ट करीत आहे.
एका मुलाला त्याच्या शाळेतल्या मैत्रीणीसोबत बसण्याची इच्छा आहे. परंतु ती मुलगी तिच्यासोबत बसू देत नाही. त्यामुळे चिडलेल्या मुलाने त्या मुलीला दाताने चावा घेतला आहे. ज्यावेळी हा प्रकार एका शिक्षिकेकडे गेला आहे, त्यावेळी त्या शिक्षिकेने त्या मुलाला कारण विचारलं. तो मुलगा म्हणाला ती मला तिच्या बाजूला बसू देत नाही. मग शिक्षिका म्हणाली तू दुसरीकडं बसं, त्यावर तो मुलगा म्हणतो, मला तिच जास्त आवडते. हे ऐकल्यानंतर त्या शिक्षिका सुध्दा हसू लागतात.
मुलाच्या आवाजाने लोकांचं मन जिंकलं
त्या मुलाचा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेकांचं मन देखील जिंकलं आहे. त्या नेटकऱ्यांना तो व्हिडीओ आवडला आहे. त्यांनी त्या व्हिडीओच्या खाली कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, त्या मुलीला सुध्दा दाखवायला पाहिजे होतं यार, दुसरा युजर म्हणतो, लहानपणीचं प्रेम कधी विसरू नका र. तिसरा युझर म्हणतो, त्या वयात आम्ही फक्त नाक साफ करायचो. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.