दिल्ली : तोंडाला पाणी सुटणारे खमंग आणि चविष्ठ डीशेश असणाऱ्या वर्ल्ड मोस्ट लिजेंडरी रेस्टॉरंटची ( World Most Legendary Restaurants ) एक यादीच जाहीर झाली आहे. त्यात हरियाणाच्या मुरथल येथील अमरिक सुखदेव ढाबा या शाकाहारी रेस्टॉरंटसह भारतातील सात रेस्टॉरंटचा टॉप 150 रेस्टॉरंटच्या यादीत समावेश झाला आहे. एक्सपिरिएन्शल ट्रॅव्हल ऑनलाईन गाईड टेस्ट एटलासने ( Taste Atlas ) ही यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील साऊथ इंडीयन पदार्थांसाठी प्रसिध्द असलेल्या माटुंगा येथील राम आश्रय ( Ram Ashraya ) रेस्टॉरंटची देखील निवड झाली आहे.
या वर्ल्ड मोस्ट लिजेंडरी रेस्टॉरंटमध्ये 11 व्या क्रमांकावर भारतातील कोझीकोडे येथील ऐतिहासिक पॅरागॉन रेस्टॉरंटचा समावेश झाला आहे. तर 12 व्या क्रमांकावर लखनऊच्या टुंडे कबाबी या रेस्टॉरंटचा क्रमांक आला आहे. त्यापाठोपाठ 17 व्या नंबरावर कोलकाता येथील पीटर कॅटचा समावेश झाला आहे. तर 23 व्या क्रमांकावर हरियाणाच्या मुरथलच्या आमरिक सुखदेव रेस्टॉरंटने नंबर पटकवला आहे. तर 39 व्या क्रमांकावर बंगळुरुच्या मवल्ली टीफीन रुम्स या रेस्टॉरंटचा नंबर आला आहे. तर 87 क्रमांकावर दिल्लीच्या करीम या रेस्टॉरंटचा तर मुंबईच्या माटुंग्यातील दाक्षिणात्य पदार्थासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रामाश्रयचा 112 वा नंबर लागला आहे.
यादीत 11 व्या क्रमांकावर निवड झालेल्या पॅरागॉन रेस्टॉरंटची साल 1939 मध्ये केरळच्या कोझीकोडे शहरात स्थापना झाली होती. येथील बिर्याणी ही आयकॉनिक डीश आहे. उच्च प्रतीचा तांदुळ, मांस आणि मसाल्यांचे मिश्रण असलेली येथील बिर्याणीची चव जीभेवर रेंगाळणारी आहे. तर यादीत बाराव्या स्थान मिळालेले लखनऊचे पारंपारिक ‘टुंडे कबाब’ अर्थात मटण कबाबसाठी विख्यात आहे. येथील कबाबचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.
हरियाणाच्या मुरथलचा अमरिक सुखदेव हा खरे तर दिल्ली ते अंबाला महामार्गावरील ढाबा होता. त्याचे आता अमरिक सुखदेव रेस्टॉरंट म्हणून नाव झाले आहे. याचा जगातील टॉप 150 यादीत 23 वा क्रमांक आला आहे. या शाकाहारी ढाब्यातील आलु पराठा लाजवाब म्हटला जातो. लोण्याच्या तुकड्यांसह हा आलू पराठा घरगुती लोणची आणि मिरचीसह सर्व्ह केला जातो. ही येथील आलू पराठा जगप्रसिद्ध आहे.
मुंबईतील माटुंगा येथील साऊथ इंडियन रेस्टॉरंट राम आश्रय हे प्रचंड लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. येथे तुम्हाला दाक्षिणात्य पदार्थाची रेलचेल पहायला मिळेल. हे पदार्थ खास पदार्थ केळीच्या पानात सर्व्ह केले जातात. या ठिकाणी सकाळी नाश्ता करण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागते. आता नवीन राम आश्रय देखील उभारण्यात आले आहे. येथील इडली, डोसा आणि सांभार आदी पदार्थांची चव जिभेवर रेंगाळणारी आहे.
रॅंक 11 : कोझीकोडे येथील ऐतिहासिक पॅरागॉन रेस्टॉरंट
रॅंक 12 : लखनऊ येथील टुंडे कबाबी
रॅंक 17 : कोलकाता येथील पीटर कॅट
रॅंक 23 : हरीयाणा- मुरुथलचा आमरिक सुखदेव ढाबा
रॅंक 39 : बंगळुरु येथील मवल्ली टीफीन रुम्स
रॅंक 87 : दिल्लीचा करिम रेस्टॉरंट
रॅंक 112 : मुंबई-माटुंगा येथील रामाश्रय