इंदूर : यंदा भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन(India’s 75th Independence Day) उत्साहात साजरा केला जाणार आहे. अनेक ठिकाणी याचे नियोजन आत्तापासूनच सुरु झाले आहे. मात्र, मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) इंदूरमध्ये(Indore) 19 दिवस आधीच स्वातंत्र्य दिन साजरा केला जाते. ही परंपरा 45 वर्ष जुनी आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन आज म्हणजेच 27 जुलै रोजी साजरा झाला. स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवाला विशेष धार्मिक महत्व आहे. यामुळे हा उत्सव पहाण्यासाठी पर्यटक देखील मोठ्या संख्यने भेट देत असतात.
इंदूरमधील उज्जैन आणि मंदसौरच्या दोन प्रसिद्ध मंदिरांमध्ये हा राष्ट्रीय उत्सव तारखेच्या 19 दिवस आधी बुधवारी(27 जुलै) साजरा केला गेला. या दोन्ही मंदिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनोख्या परंपरेनुसार हा स्वातंत्र्य उत्सव दणक्यात साजरा केला गेला. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. यावर्षी ही तारीख 27 जुलै (बुधवार) रोजी पडली.
जेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला, तेव्हा हिंदू दिनदर्शिकेनुसार महिन्याचा कृष्ण पक्ष होता. श्रावण साजरा करण्यात आला ती चतुर्दशी होती असे उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळील बडा गणेश मंदिराचे प्रमुख आनंद शंकर व्यास यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून या तारखेला विशेष पूजा केली जाते. मागील 45 वर्षांपासून या मंदिरांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या वार्षिक उत्सवाचा एक भाग म्हणून, लोक झांज, डमरू, शंख आणि घंटा-घड्याळ अशी पारंपारिक वाद्ये वाजवत रॅली काढली जाते. या रॅलीत सहभागी झालेले लोक तिरंगा ध्वज घेऊन बडा गणेश मंदिरात पोहोचले. सालाबादप्रमाणे मंदिरात गणेशाची आणि तिरंग्याची पूजा करण्यात आली आणि भोग-आरतीनंतर पूर्ण आदराने राष्ट्रध्वज मंदिरावर फडकवण्यात आला.
इंदूरपासून सुमारे 250 किमी अंतरावर मंदसौरमधील शिवना नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन पशुपतीनाथ मंदिरात देखील बुधवारी स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान अष्टमुखी शिवलिंगाची विशेष सजावट करण्यात आली होती. दुर्वा आणि पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केला आणि वैदिक मंत्रांचे पठण केले आणि देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली असे पशुपतीनाथ मंदिरातील पुजारी आणि यजमानांची संघटना असलेल्या “ज्योतिष आणि अनुष्ठान परिषदे”चे अध्यक्ष उमेश जोशी यांनी सांगितले. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्वातंत्र्य दिन पशुपतीनाथ मंदिरात मर्यादित स्वरूपात साजरा केला जात होता, परंतु यावेळी मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जोशी यांच्या मते, मंदसौरच्या या प्राचीन मंदिरात श्रावण कृष्ण चतुर्दशीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परंपरा 1985 पासून सुरू असल्याचे जोशी म्हणाले.