VIDEO | रस्त्याने जाणाऱ्या एका स्कूटीवर 8 जण बसले, त्या व्यक्तीचा जुगाड पाहून लोकांनी डोक्यावर हात लावला

| Updated on: Jun 22, 2023 | 10:07 AM

VIDEO VIRAL | सध्या ९ सेंकदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका स्कुटीवर इतकी लोकं बसली आहेत की, पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे.

VIDEO | रस्त्याने जाणाऱ्या एका स्कूटीवर 8 जण बसले, त्या व्यक्तीचा जुगाड पाहून लोकांनी डोक्यावर हात लावला
trending news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्याच्या घडीला बहुतेक जणांच्याकडे गाडी आहे. मग ती चार चाकी असो, नाहीतर दुचारी असो. बाईकवरती किती लोकं बसू शकतात ? हे तर तुम्हाला चांगलचं माहित आहे. स्कुटी किंवा बाईकवरती नियमानुसार (scooty) दोन लोकांना बसण्याची क्षमता असते. समजा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एका बाईकवरती दिसल्यानंतर त्यावर पोलिस कारवाई करतात. अनेक लोकं नियमावली पाळत नसल्याचे पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आठ मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे. ज्यावेळी ही व्यक्ती गाडी चालवत होती, त्यावेळी एका प्रवाशाने हा व्हिडीओ (trending video) तयार केला आहे.

व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ ट्विटरवरती @Ayesha86627087 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडीओ ९ सेकंदाचा आहे. त्यामुळे आठ मुलं सोबत असताना ती व्यक्ती कशी गाडी चालवत आहे, हे पाहायला मिळत आहे. एक मुलगा स्कुटीवरती मागच्या बाजूला स्टँडवरती उभा आहे. तीन मुलं बसली आहे. त्यापैकी दोन पुढे उभी केली आहेत. एक मुलगा एका बाजूला वाईट स्थिती उभा आहे. जी व्यक्ती गाडी चालवत आहे. त्या व्यक्तीने हेल्मेट सुध्दा घातलेलं नाही. बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ आतापर्यंत 63 हजार लोकांनी पाहिला आहे. लोकं व्हिडीओ कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याच्या आगोदर सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर अशा व्यक्तींवरती पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. ट्रॅफिक पोलिस अशा पद्धतीने गाडी चालवू नये असं वारंवार सांगत आहेत. तरी सुध्दा काही लोकं नियम पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलं ती गाडीवरुन खाली कधीही पडू शकतात. या व्हिडीओबाबत तुमचं मत काय आहे ? आम्हाला कमेंटकरुन सांगा.