VIDEO | 84 वर्षाच्या आजोबांची कमाल, चोराला पकडण्यासाठी केला जुगाड

| Updated on: Sep 06, 2023 | 3:24 PM

Trending Video | एखाद्या चोराला पकडण्यासाठी कुणीही तयार होत नाही, परंतु हेचं डेरिंग सध्या एका आजोबांनी केलं आहे. 84 वर्षाच्या आजोबांचा चोराला पकडण्याचा जुगाड सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

VIDEO | 84 वर्षाच्या आजोबांची कमाल, चोराला पकडण्यासाठी केला जुगाड
trending news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्यामध्ये आजोबांनी एका चोरट्याला आपल्या जुगाड पद्धतीने ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे त्या आजोबाचं वय ८४ असल्याचं एका वेबसाईटने सांगितलं आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (trending news) अधिक व्हायरल झाला आहे. ज्यावेळी ते चोराला पकडत होते. त्यावेळी त्यांना जखम झाल्याची माहिती समजली आहे. लोकांनी त्या आजोबांचं (grandfather) अधिक कौतुक केलं आहे.

गर्दीचा फायदा अनेक चोरटे घेत असतात, मोबाईल किंवा पर्स चोरून तिथून पळ काढतात, त्यांना गर्दीत पकडणं लोकांना आणि पोलिसांना सुध्दा अवघड होतं. परंतु आजोबाचा सध्याचा जुगाड लोकांना अधिक फायदेशीर ठरणार आहेत. आजोबांचं वय अधिक आहे. त्या चोराला पकडण्याच्या नादात आजोबांचा पाय घसरला आहे. ते खाली पडले आहेत. त्याचबरोबर त्यांना जखम सुध्दा झाली आहे. परंतु त्यांनी चोराला पकडलं आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी आजोबांनी चोराच्या पायात पाय घातला, त्यावेळी चोर आणि आजोबा दोघेही पडले. पकडलेल्या चोराला लोकांनी ताब्यात घेतलं. लोकांनी त्याची चांगली धुलाई केली असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ @RobberyFaiI यांच्या खात्यावरुन शेअर झाला आहे. १५ सेंकदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर 7 लाख 20 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर १२ हजार लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने सांगितले आहे की, त्या व्यक्तीला कसल्याही गोष्टीचा त्रास नको आहे. खऱ्या जीवनात अशी प्रकारची फिल्म आहे. आणखी एका व्यक्तीने लिहीलं आहे. आताच्या किंवा नव्या दमाच्या लोकांनी हे सगळं शिकायला हवं.