मुंबई : गेलेले दिवस परत येत नाहीत. परंतु जुन्या घडलेल्या गोष्टीची आपण आठवण काढू शकतो. जुन्या आठवणी लोकांना सांगायला आवडतं. कारण ते दिवस आता पुन्हा येत नाहीत. इंग्रजांच्या काळातील आजही इमारती आणि काही ठिकाणी रस्ते पूल मजबूत स्थितीत आहेत. त्याच पद्धतीने जुन्या गाड्या सुध्दा अधिक मजबूत होत्या, त्याची आजही आपल्या घरातील वयोवृध्द माणसं आठवण काढतात. काही जुने व्हिडीओ (viral news) आजही पाहिले जातात. सध्या सोशल मीडियावर एका जुन्या बिलाची (trending news) जोरदार चर्चा सुरु आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही सु्ध्दा चिंतेत पडाल. खरतर ते एका सायकरलचं बिल (old cycle bill viral) आहे. 1934 साली सायकलची किंमत एवढी होती की, त्या पैशांमध्ये सध्या आपला चहा नाष्टा सुध्दा होत नाही.
तो काळ असा होता की, त्यावेळी घरी सायकल असणं खूप मोठी गोष्ट होती. परंतु बदलत्या काळानुसार लोकांची लाईफस्टाईल बदलून गेली आणि सायकल सुध्दा बदलली आहे. आता सायकलची जागा बाईकने घेतली आहे. त्यावेळी सायकल फक्त १८ रुपयाला मिळत होती. परंतु आता तो काळ गेला आहे. सध्या सायकलचे दर सुध्दा गगनाला भिडले आहेत. बाजारात विविध पद्धतीच्या सायकल उपलब्ध आहेत. ज्या व्यक्तीला जी सायकल घेण्यासाठी परवडत आहे, ती व्यक्ती ती सायकल खरेदी करीत आहे. सध्या जुन्या सायकलचं एक बिल सगळ्याचं लक्ष वेधत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल.
Just found a 90 yr old bicycle bill, just 18 Rs
I believe at that time 18 Rs is equivalent to 1800 Rs. Am I Right?#oldbill #Cycle #foundsomethingnew #heritage #olddays pic.twitter.com/Rs7XXcZYUz— Pushpit Mehrotra (@pushki3) November 29, 2022
ते सायकलचं बिल 88 वर्षांपूर्वीचं आहे. 1934 साली एका व्यक्तीने सायकल खरेदी केली होती. हे बिल पाहिल्यानंतर लोकं जुन्या गोष्टींची आठवण काढतील एवढं निश्चित. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हे बिल व्हायरल झालं आहे. त्यावेळी त्या सायकलचं बिलं फक्त १८ रुपये होतं. त्यावेळचं ते बिल सध्या 1800 रुपयांच्या बरोबर आहे. हे बिल गेल्यावर्षी शेअर केलं होतं.