मुंबई : बालपण प्रत्येकाचं मजेशीर असतं, कारण त्यामध्ये मजा आणि मस्ती अधिक असते. कसल्याही प्रकारचं टेन्शन आणि जबाबदारी नसते. त्यावेळी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आयुष्य जगत असता. तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य दिलेलं असतं. त्यावेळी घरात अभ्यास आणि तुमच्या मम्मीचा दबाव होता. परंतु ती सगळ्यात चांगली वेळ होती. @Laiiiibaaaa या ट्विटरच्या (twiiter viral news) खात्यावरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. खरंतर तु्म्हाला ही पोस्ट वाचल्यानंतर तुमचे लहानपणीची आठवण नक्की येणार आहे. एका सहा वर्षाच्या मुलाने त्याचं दिवसभराचं टाइम टेबल (time table) तयार केलं आहे. ज्यावेळी तुम्ही ते टाइमटेबल वाचण्यासाठी घ्यालं. त्यावेळी वाचताना तुम्हाला सुध्दा हसू आवरणार नाही. त्यामध्ये अभ्यासासाठी केवळ 15 मिनट वेळ दिला आहे. एक खेळण्यासाठी (trending news) वेळ दिला आहे. बाकी आजी-आजोबा आणि इतर गोष्टीसाठी सगळा वेळ दिला आहे.
ही पोस्ट 1.2 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर त्यावरती अधिक प्रतिक्रिया सुध्दा आल्या आहेत. लोकांना त्या मुलाचं टाइम टेबल वाचताना हसू आवरणात नाही. काही लोकांनी कमेंटमध्ये आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगितल्या आहेत. अशी दिनचर्या असल्यामुळे अभ्यास फक्त एक औपचारिकता आहे.
My 6 year old cousin made this timetable…Bas 15 minutes ka study time, zindgi tu Mohid jee ra hai ?? pic.twitter.com/LfyJBXHYPI
— Laiba (@Laiiiibaaaa) June 22, 2023
सोशल मीडियावर लहान मुलांच्या अधिक गोष्टी शेअर होत असतात. त्यापैकी काही चांगल्या गोष्टी असतात. तर काही मजेशीर गोष्टी असतात. मजेशीर गोष्टी पाहायला लोकांना अधिक आवडते. त्याचबरोबर त्या गोष्टी अधिक शेअर सुध्दा होतात. ते व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं कमेंट सुध्दा करतात आणि म्हणतात आजची मुलं अधिक हुशार आहेत.