Chick Viral Video : तुम्ही कधी कोंबडी (Hen) किंवा तिचं पिल्लू भिंतीवर चढताना पाहिलंय? नसेल तर आताच बघा. सोशल मीडियावर कोंबडीच्या पिलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ज्या पद्धतीने पिल्लू भिंतीवर चढताना दिसतंय, ते पाहून सोशल मीडिया (Social Media) यूझर्स आश्चर्यचकित होत आहेत. एक दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे, की ही पिल्लं जेम्स बाँड(James Bond)ची आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक पिल्लू घराच्या मागील अंगणात भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, पिल्लू स्पायडरमॅनप्रमाणं भिंतीवरून वर चढत असल्याचे तुम्ही पाहू शकता.
मालकालाही नव्हती कल्पना
व्हिडिओमध्ये असं दिसतं, की ते संपूर्ण भिंत ओलांडतं. मात्र तिथून उडी मारण्याचा प्रयत्न करताच व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीनं त्याला पकडलं. या दरम्यान, आपण त्या व्यक्तीला अविश्वसनीय बोलत असल्याचं ऐकू शकता. आपलं पिल्लू भिंतीवर चढू शकतं, याची या व्यक्तीलाही कल्पना नव्हती.
मालकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न
या व्हिडिओचा दुसरा भाग पाहिल्यास हे पिल्लू मालकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. पिल्लू काही प्रमाणात त्याच्या योजनेत यशस्वी होतो, परंतु शेवटच्या क्षणी त्याचं नशीब बिघडतं. यानंतर ते पुन्हा मालकाच्या तावडीत अडकतं.
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर
‘जेम्स बाँड’ पिल्लाचा हा मजेदार व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर viralhogनं शेअर केला आहे. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, की द ग्रेट डकलिंग एस्केप.’ एक दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत तो 52 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी पिल्ल्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. पिल्लाबद्दलच्या कमेंट्सही केल्या आहेत.