मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड (video viral) व्हायरल झाला. त्यामध्ये एक मुलगी मुंबईतील एका स्टेशनवरती डान्स करीत आहे. त्या मुलीचा डान्स (Mumbai Local Train Station Dance Video) लोकांना इतका आवडला आहे की, त्यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर लोकांनी तो व्हिडीओ शेअर सुद्धा केला आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडीओ अनेक पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे व्हिडीओ लोकांना आवडतात, ते व्हायरल सुध्दा होतात. सध्याचा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे.
आतापर्यंत सोशल मीडियावर मेट्रोमधील अनेक डान्स व्हायरल झाले आहेत. गाणे गात असलेल्या लोकांचं व्हिडीओचं सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष खेचत आहे. त्या मुलीने ‘लेके पहला पहला प्यार’ या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे हा डान्स पाहून लोकांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. _theshreyasingh_official या अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला आहे, त्याचबरोबर लाईक सुध्दा केलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 9 लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला २० एप्रिल रोजी शेअर केलं होतं. हा व्हिडीओ पाहिलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी त्या तरुणीच्या डान्सचं कौतुक देखील केलं आहे. काही लोकांनी त्या मुलीला दंड करा असं सुध्दा म्हटलं आहे.