मुंबई : सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) होतात. विशेष म्हणजे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ लोकांना पाहायला आवडतात असं अनेकदा दिसून आलं आहे. महाराष्ट्रात अनेकवेळा आपण प्राणी घराच्या बाजूने शिकारीच्या शोधात फिरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. बिबट्या (LEOPARD ATTACK ON DOG) हा प्राणी महाराष्ट्रात अनेकांना दिवसाढवळ्या दर्शन देत आहे. त्याचबरोबर रात्री सुध्दा बिबट्याने अनेकांवरती हल्ला केला आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जंगलातील एक बिबट्या रात्रीच्यावेळेत घराच्या गेटवरुन उडी मारुन प्रवेश करतो. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ आला आहे. त्यामध्ये एक बिबट्या घराच्या गेटवरुन उडी मारुन आतमध्ये आला आहे. त्यावेळी तिथं झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. ज्या पद्धतीने बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला, त्यावेळी कुत्र्याची आज बिबट्या करणार असं वाटतं होतं. पण कुत्रा आणि बिबट्यामध्ये संघर्ष झाला. शेवटी घरातील मालक बाहेर आला अन् बिबट्याने तिथून धूम ठोकली असल्याचं पाहायला मिळालं.
बिबट्या आणि कुत्र्यामधील संघर्ष सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ppredator_wildlifevids नावाच्या अकाऊंटवरुन इंस्टाग्राम शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ खाली आतापर्यंत अनेक कमेंट आल्या आहेत. त्यामध्ये अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ कोणत्या भागातील आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे अशा पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर झाला आहे.
बिबट्याने आतापर्यंत रात्रीच्यावेळी अनेकदा पाळीव कुत्र्यांना टार्गेट केलं आहे. त्याचबरोबर पाळीव कुत्र्यांची शिकार सुध्दा केली आहे. पण व्हायरल व्हिडीओमध्ये मालक उठल्यामुळे कुत्र्याचा जीव वाचला आहे.